आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Modi Live News And Updates | Modi Address 2nd National Youth Parliament Festival

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॅशनल यूथ पार्लियामेंट फेस्टिव्हल:PM मोदी म्हणाले - देशाचा सर्वात मोठा शत्रू राजकीय वंशवाद, हे मुळापासून हटवायचे आहे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा हा दिवस आपणा सर्वांना प्रेरणा देतो

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून नॅशनल यूथ पार्लियामेंट फेस्टिव्हलला संबोधित केले. ते म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा हा दिवस आपणा सर्वांना प्रेरणा देतो. हे यावेळी विशेष आहे कारण यावेळी युवा संसद, संसदेच्या सेंट्रेल हॉलमध्ये होत आहे. या हॉलमध्ये आपल्या स्वातंत्र्याचे निर्णय घेण्यात आले.

त्यांनी सरकारच्या धोरणांमधील तरुणांचा उल्लेखही केला. मोदी म्हणाले की, देशात लागू झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे लक्ष चांगल्या व्यक्तींच्या निर्मितीवर आहे. हे धोरण तरुणांचे कौशल्य, समज आणि निर्णयाला प्रथम प्राधान्य देते.

वंशवाद हा देशाचा सर्वात मोठा शत्रू

यावेळी त्यांनी वंशवादी राजकारणालाही लक्ष्य केले. ते म्हणाले की राजकीय वंशवाद हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ते मुळापासून काढून टाकावे लागेल. आडनावाच्या मदतीने निवडणुका लढविणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत.

मी तरुणांचे भाषण ट्विट करेल
ते म्हणाले की, तुमच्या मनात अशी कल्पना करा, तुम्ही ज्या ठिकाणी देशातील महान माणसे बसली होती तेथे बसून आहात. तुम्हाला देशाकडून किती अपेक्षा आहेत. मला वाटतं की इथे बसलेल्या तरुण साथीदारांना याची जाणीव झालीच पाहिजे. मी येथे आपणास ऐकत असताना विचार आला की, माझ्या ट्विटर हँडलद्वारे मी आपले भाषण ट्विट करेल. कारण देशाला कळेल की, संसदेच्या या परिसरात आपला भावी भारत कसा आकार घेत आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

मोदी म्हणाले की, तुम्ही पाहत असाल की भारतातील क्वचितच असे एखादे गाव, शहर असेल, व्यक्ती असेल जो स्वतःला विवेकानंद यांच्याशी जोडलेला नसेल. स्वामी जींनी देशाला, त्याच्या सामर्थ्याला राष्ट्रीय चेतनेला जागृत केले. तुम्ही जाणून हैरान व्हाल की, जे स्वातंत्र्याची लढाई लढत होते, ते कुठे ना कुठे स्वामींशी प्रेरित होते. त्यांच्या अटकेवेळी स्वामीजींचे साहित्य त्यांच्याजवळ अवश्य सापडायचे.

बातम्या आणखी आहेत...