आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pm Modi | Marathi News | Jevar Airport | When Prime Minister Narendra Modi Arrives For The Groundbreaking Ceremony Of The Airport, The World's Fourth Largest Airport

जेवर विमानतळातचे भूमीपूजन:पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले - एकेकाळी घोटाळे-माफियांसाठी घेतले जायचे युपीचे नाव, आता मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवर विमानतळाचे भूमीपूजन केले आहे. जेवर विमानतळ हे जगाची कनेक्टिविटी वाढवण्यास मदत करेल असे मोदी म्हणाले. हे विमानतळ उत्तर प्रदेशला थेट आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणार आहे. यामुळे शेतकरी पालेभाज्या, फळे, मासे यासारख्या वस्तू विदेशात पाठवणे शक्य होईल. तसेच मेरठच्या पेठांना देखील विदेशी मार्केट मिळू शकणार आहे. असे मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर यूपीला अनेक जण टोमणे लगवायचे. कधी गरिबीचे टोमणे, कधी घोटाळ्यांचे टोमणे, कधी खराब रस्त्यांचे टोमणे, कधी माफियांचे टोमणे. मात्र आता यूपीत आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. यापूर्वी राजकीय फायद्यासाठी रेवड्यांसारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प कसा मार्गी लागेल, याचा विचार कोणी करत नव्हता. गेली कित्येक वर्ष हे प्रकल्प रखडले होते. असे विधान मोदींनी केले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, जिनांच्या अनुयायांनी उसाच्या गोडीत कडूपणा मिसळला होता. मात्र आता उसाचे गोडवे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी हे विमानतळ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. असे योगी म्हणाले.

सप्टेंबर 2024 पासून विमानतळ उड्डाणासाठी होणार खुले

नोएडा इंटरनेशनल विमानतळ हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमानतळ असणार आहे. सुमारे 6200 एक्करमध्ये याची उभारणी केली जात आहे. त्यासाठी सुमारे 29,650 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 1,334 हेक्टरवर रनवे तयार केले जाणार आहे. त्यासाठी 2024 पर्यंतचा कालावधी लागेल.

सप्टेंबर-2024 पासून भारतातील 9 शहरांसह दुबईसाठी उड्डाणे सुरू व्हावीव, असा सरकारचा मानस आहे. 2050 पर्यंत संपूर्ण विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या विमानतळाजवळ विमानांच्या देखभालीसाठी देशातील सर्वात मोठे केंद्र देखील उभारले जाणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या केंद्राची देखील पायाभरणी केली जाणार आहे.

सुरक्षा दलाचे 10 हजार जवान तैनात

नोएडा एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, पायाभरणी समारंभाच्या ठिकाणी तसेच आसपासच्या परिसरात सुमारे 10,000 सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये यूपी पोलिसांचे पाच हजार जवान आहेत. याशिवाय पीएसी आणि पॅरा मिलिटरी फोर्सचे तीन हजार जवान आहेत. या सर्वांशिवाय एसपीजी, एनएसजी, एटीएसचे कमांडो पोहोचले आहेत.

बातम्या आणखी आहेत...