आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi | Marathi News | PM Narendra Modi Remembers CDS General Rawat At UP Balrampur Rally Latest News And Updates

उत्तर प्रदेशात मोदी:यूपीतल्या सभेत पीएम मोदींनी वाहिली सीडीएस रावत यांना श्रद्धांजली; म्हणाले - ते जिथेही असतील देश विकसित होताना पाहतील

बलरामपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यात सरयू सरोवर राष्ट्रीय प्रकल्पाचे लोकार्पण केले. यावेळी हसुआडोलच्या गावकऱ्यांना संबोधित करताना मोदींनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांची आठवण काढली. रावत यांना श्रद्धांजली देताना पंतप्रधान म्हणाले, की ते जिथे कुठेही असतील तेथून देशाचा विकास होताना पाहतील.

पीएम मोदी सभेला संबोधित करताना सांगितले, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्वच वीरांप्रती संवेदना व्यक्त करतो. भारताचे पहिले CDS (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत यांचे निधन प्रत्येक भारतीयासाठी एक मोठे नुकसान आहे. ते शूर होते आणि त्यांनी देशातील सशस्त्र दलांना स्वावलंबी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. देश याचा साक्षीदार आहे.

भारत थांबणार नाही
ते पुढे म्हणाले, भारत शोकमध्ये आहेत. परंतु, वेदना कितीही असल्या तरीही आपण आपला विकास आणि वेग थांबवणार नाही. आम्ही भारतीय सोबत मिळून खूप मेहनत घेऊ आणि देशाच्या आतून तसेच बाहेरून येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करू. आम्ही भारताला अधिक शक्तीशाली आणि समृद्ध बनवू.

मोदींच्या कार्यक्रमासाठी 5 हेलीपॅड, 50 हजार खुर्च्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी बलरामपूरच्या सभेत येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण यंत्रणा आणि प्रशासनाने सतर्कतेने काम केले आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्या ठिकाणी 5 हेलिपॅड तयार करण्यात आले. यामध्ये 3 हेलिपॅडचा वापर पंतप्रधान आणि त्यांच्या सुरक्षेत तैनात अधिकारी करतील. एक हेलिपॅड यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दुसरे हेलिपॅड राज्यपाल आनंदी बेन पटेल यांच्यासाठी ठेवण्यात आले होते. यासोबत, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य जनतेला बसण्यासाठी 50 हजार खुर्च्या लावण्यात आल्या. या सभेत 2 लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

तामिळनाडूत कोसळले हेलिकॉप्टर
तामिळनाडूच्या जंगलात लष्कराचे Mi-17 हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह 14 जण होते. या अपघातात जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह सध्या लाइफ सपोर्टवर आहेत.

बातम्या आणखी आहेत...