आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi May Call An All Party Meeting In The End Of June, Shah Today Held A Meeting With RAW And IB Chief Including Doval; News And Live Updates

कलम 370 हटवल्यानंतरही गतिरोध सुरूच:जम्मू काश्मीरवर मंथन करण्यासाठी पंतप्रधान जूनमध्ये घेणार सर्वपक्षीय बैठक; गतिरोधसह विधानसभा निवडणुकीवर होऊ शकते चर्चा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये हटवले होते कलम 370

मोदी सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा कमी केला होता. तेंव्हापासून राज्यात राजकीय गतिरोध सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याशी संबंधित विषयांवर अंतर्गत उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या आठवड‌यात म्हणजेच जून अखेरीस सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना माहिती पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, सध्या या बैठकी संदर्भात औपचारिकपणे सांगण्यात आलेले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत राज्यात सुरु असलेल्या राजकीय गतिरोधासह केंद्र शासित प्रदेशाला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या विषयावरदेखील चर्चा केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणे अपेक्षित आहे. राज्यात 2018 पासून निवडणुका प्रलंबित असून गेल्या वेळी मेहबूबा मुफ्ती आणि भाजपमधील युती तुटली होती.

गृहमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरिय बैठक
गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी एका उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह सचिव अजय भल्ला, आयबीचे प्रमुख अरविंद कुमार, रॉचे प्रमुख सामंत कुमार गोयल, सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल कुलदीप सिंह आणि जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांचा समावेश होता. या बैठकीपूर्वी शहा यांनी राज्याचे उप राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी मुलाखत केली होती. दरम्यान, या दोन्ही बैठकीला राज्याच्या अतर्गंत विषयाशी महत्वपूर्ण मानले जात आहे.

केंद्राने ऑगस्ट 2019 मध्ये हटवले कलम 370
केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले होते. त्यावेळी राज्याला दोन भागात म्हणजेच जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विभागले गेले. या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तथापि, काही महिन्यांनंतर त्याला सोडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...