आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसरला पोहोचले पंतप्रधान मोदी:डेरा ब्यासच्या प्रमुखांना भेटले, हिमाचल निवडणुकीपूर्वी केली चर्चा

अमृतसर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी अमृतसरला पोहोचले. त्यांचे हेलिकॉप्टर थेट ब्यास स्थित डेरा राधा स्वामीमध्ये लँड झाले. तिथे त्यांचे स्वगत स्वतः डेरा मुखी बाबा गुरिंदर सिंग ढिल्लो यांनी केले. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे भाजप डेरा भक्तांचे मतदान आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

राधा स्वामी डेऱ्यात चर्चा करताना डेरामुखी व पंतप्रधान.
राधा स्वामी डेऱ्यात चर्चा करताना डेरामुखी व पंतप्रधान.

पंतप्रधान नरेंद्र मोदी डेरा राधा स्वामी ब्यासला पोहोचल्यानंतर त्यांचे स्वागत बाबा गुरिंदर सिंग यांनी स्वतः केले. त्यानंतर मोदींनी त्यांच्यासोबत डेऱ्याचा आढावा घेतला. लंगर हॉललाही भेट दिली. या किचनमध्ये एकाचवेळी लाखो लोकांचे जेवण तयार होते, हे ऐकून मोदी यावेळी थक्क झाले. स्वयंपाकाच्या व्यवस्थेसह डेरा परिसराची स्वच्छता पाहूनही ते खूप प्रभावित झाले.

डेरा राधा स्वामीचे स्वयंपाकघर पाहून मोदी थक्क झाले.
डेरा राधा स्वामीचे स्वयंपाकघर पाहून मोदी थक्क झाले.

बंद खोलीत झाली चर्चा

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मोदी डेऱ्याहून थेट हिमाचलच्या दिशेने रवाना झाले. राजकीय तज्ज्ञांच्या मते, मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी डेऱ्याला भेट दिली.

पंजाब निवडणुकीपूर्वीही झाली होती भेट

पंतप्रधान मोदी व डेरामुखींची ही काही पहिलीच भेट नाही. त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीही डेरा प्रमुखांशी चर्चा केली होती. पण ही चर्चा डेऱ्यात नव्हे तर पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात झाली होती. या भेटीतच दोघांनी पुढील भेट ब्यास डेऱ्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मोदी आज डेऱ्यात पोहोचले.

शेतकऱ्यांची निदर्शने

खलिस्तानी समर्थकांच्या धमक्या व शेतकऱ्यांच्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर थेट डेऱ्याच्या आत उतरले. त्यांच्या या दौऱ्यासाठी कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. दरम्यान, शेतकरी-मजूर संघर्ष मोर्चाने सर्वच जिल्ह्यांत मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला रोष व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...