आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोहतांगमध्ये अटल टनल आजपासून सुरू:मोदींनी 10 हजार फूट उंचीवर बनलेल्या जगातील सर्वात लांब बोगद्याचे केले उद्घाटन, संरक्षणमंत्र्यांचीही होती उपस्थिती

7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • हिमालयातील पीर पंजाल डोंगररांगेत रोहतांग खिंडीलगत लेह-मनाली महामार्गावर बांधले गेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी रोहतांगमध्ये अटल टनलचे उद्घाटन केले. जवळपास 10 हजार फूट उंचीवरर बनलेला हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. याची लांबी 9.2 किमी आहे. हे बनवण्यास 10 वर्षांचा काळ लागला.

हे हिमालयातील पीर पंजाल डोंगररांगेत रोहतांग खिंडीलगत लेह-मनाली महामार्गावर बांधले गेले आहे. यामुळे मनाली ते लेह हे अंतर 46 किलोमीटरने कमी होईल आणि चार तासांची बचत होईल. याचे नाव माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर आहे.

10 हजार फूटांच्या उंचीवर बनले
जगातील सर्वात लांब अटल बोगदा

यातून काय फायदा होईल?

 • बोगद्यामुळे मनाली आणि लाहोर-स्पीती व्हॅली 12 महिने जोडलेले राहिल. मुसळधार हिमवृष्टीमुळे या खोऱ्याचा सहा महिने संपर्क तुटतो. बोगद्याचे दक्षिण पोर्टल मनालीपासून 25 कि.मी. अंतरावर आहे. तर उत्तर पोर्टल लाहुल खोऱ्यामध्ये सीसूच्या तेलिंग गावाजवळ आहे.
 • बोगद्यातून जात असताना, सपाट रस्त्यावरुन जात असल्यासारखे वाटेल, परंतु बोगद्याच्या एका भागात आणि दुसर्‍या भागात 60 मीटर उंचीचा फरक आहे. दक्षिण पोर्टल समुद्रसपाटीपासून 3000 मीटर उंचीवर आहे, तर उत्तर पोर्टल 3060 मीटर उंच आहे.

10.5 मीटर रुंद, 10 मीटर उंच बोगद्याची खासियत

 • 2958 कोटी रुपये खर्च आला.
 • 14508 मीट्रिक स्टील लागले.
 • 2,37,596 मीस्ट्रीक सीमेंटचा झाला वापर.
 • 14 लाख घन मीटर डोंगर खोदले.
 • प्रत्येक 150 मीटर अंतरावर 4 जी ची सुविधा.

अटल बोगद्यात राहतील या सुविधा

 • प्रत्येक 150 मीटरच्या अंतरावर एक टेलीफोन
 • प्रत्येक 60 मीटरच्या अंतरावर फायर सिस्टम
 • प्रत्येक 250 मीटरच्या अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे
 • प्रत्येक 500 मीटरवर इमरजेंसी एग्जिट
 • प्रत्येक 2.2 किमीवर गुहा मोड
 • 80 किमी/तास राहणार वाहनांची स्पीड
 • प्रत्येक दिवशी 4500 वाहन या बोगद्यातून प्रवास करतील असा अंदाज

पहिले हा विक्रम चीनच्या नावावर होता
अटल बोगद्यापूर्वी हा विक्रम चीनच्या तिबेटमधील बोगद्याच्या नावावर होता. ल्हासा आणि न्यिंग्ची दरम्यान 400 किमी लांबीच्या महामार्गावर हे बांधले गेले आहे. त्याची लांबी 5.7 किमी आहे. हे मिला माउंटेनवर बांधले गेले आहे. त्याची उंची 4750 मीटर म्हणजेच 15583 फूट आहे. ते तयार करण्यासाठी 38500 कोटी रुपये खर्च झाले. हे 2019 मध्ये सुरू झाले.

या बोगद्याचे नावर दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.
या बोगद्याचे नावर दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...