आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाविरुद्ध लढाई:मोदी म्हणाले- आपण एका अदृश्य शत्रूविरूद्ध लढा देत आहोत; ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने पसरत आहे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे किसान सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वाटप केला. परंतु या कार्यक्रमातही कोरोनाबद्दलची त्यांची चिंता स्पष्ट दिसत होती. मोदी म्हणाले की, आपण अदृश्य शत्रूचा सामना करत आहोत. याविरुद्ध युद्धपातळीवर लढाई सुरू आहे. मोदी म्हणाले की, कोरोना ग्रामीण भागात झपाट्याने पसरत आहे. ग्रामीण लोकांनाही मास्क घालण्यासह इतर प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • 100 वर्षांनंतर आलेली ही भयंकर महामारी प्रत्येक पावलावर जगाची परीक्षा घेत आहे. आपल्या समोर एक अदृश्य शत्रू आहे. आपण आपल्या बऱ्याच जवळच्या लोकांना गमावले आहे. मागील काही काळात देशवासीयांनी ज्या वेदना सोसल्या त्या मलासुद्धा जाणवत आहे.
  • या संकटाच्या प्रसंगी, काही लोक औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार स्वार्थापोटी करत आहेत. अशा लोकांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मी राज्य सरकारांना विनंती करतो. हे कृत्य मानवतेविरूद्ध आहे.
  • भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत. आपण लढू आणि जिंकू.
  • देशभरातील सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण केले जात आहे. त्यामुळे लस अवश्य घ्या.
  • ही लस आपल्याला कोरोनाविरूद्ध संरक्षण देईल आणि गंभीर आजाराची शक्यता कमी करेल. मास्क आणि सुरक्षित अंतर हा मंत्र कोणीही सोडू नये.
बातम्या आणखी आहेत...