आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे. पंरप्रधान नरेंद्र मोदी जवळपास तीन तास अयोध्येमध्ये थांबणार आहे. यादरम्यान त्यांनी राम मंदिराच्या परिसरामध्ये प्राजक्ताचे रोपटे लावले आहे. त्यानंतर भूमिपूजन सोहळ्यास सुरूवात झाली. आजच्या भूमिपूजन सोहळ्यात प्राजक्ताच्या झाडाचे महत्त्व काय हे आपण जाणून घेणार आहोत.
वेद-पुराणांमध्ये पारिजातकांच्या झाडाचं अत्यंत महत्त्व सांगण्यात आलं आहे. या भूमिपूजन सोहळ्याचा भाग झालेल्या पारिजातकाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य काय आहे, हे आपण जाणून घेऊया.
वेद-पुराणांमध्ये खूप महत्त्व
प्राजक्ताचे झाडाचे वेद-पुराणांमध्ये खूप महत्त्व आहे. हे वृक्ष दिसालया अत्यंत सुंदर असते. याची फूलंही मनमोहक असतात. प्राजक्ताची फुले भगवान श्रीकृष्ण यांच्या पूजेमध्ये वाहिली जातात. या मोहक आणि सुवासिक फुलांना हरीचा शृंगार असेही म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये या झाडाला फार महत्त्वाचे मानले जाते.
श्रीकृष्णाविषयी आख्यायिका
प्राजक्त झाडाविषयी कहानी सांगितली जाते की, हे झाड साक्षात श्रीकृष्ण स्वर्गातून धरतीवर घेऊन आलेले आहेत. सत्यभामेचा हट्ट पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णाने हे झाड धरतीवर आणले असल्याचे बोलले जाते. त्यानंतर ते गुजरातमधील द्वारकेत स्थापित करण्यात आलं होतं.
लक्ष्मीविषयी आख्यायिका
पारिजातकाची फुले लक्ष्मी देवीला खूप प्रिय असल्याचेही बोलले जाते. लक्ष्मी देवतेला प्रसन्न करण्यासाठी पारिजातकाची फुले अर्पण करण्यात येतात. यासोतबच 14 वर्षांच्या वनवासामध्ये देवी सीता या प्राजक्तांच्या फुलांनी स्वत:चा साजशृंगार करत असतं असेही म्हटले जाते.
शुभं मानलं जातं हे रोपटं
हे झाडं शुभं मानलं जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजनापूर्वी मंदिराच्या अंगणात हे झाडं लावलं आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.