आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Says 3 Corona Vaccines Under Testing In India At Different Stages, Ready To Vaccinate Every Indian In Less Time

कोरोनावर मोदींची घोषणा:पंतप्रधान म्हणाले - भारतात 3 कोरोना लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात, प्रत्येक भारतीयाला कमी वेळात लस देण्याची तयारी पूर्ण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसींना वैज्ञानिकांकडून परवानगी मिळाल्यानंतर तातडीने मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाईल - पंतप्रधान

कोरोना काळात देशाचा 74 वा स्वातंत्र दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हायरस रोखण्याविषयी घोषणा केली. ते म्हणाले की भारतात कोरोना लसीची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात आहे. कमी कालावधीत प्रत्येक भारतीयांना ही लस देण्याची पूर्ण तयारी केली आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोदी लाल किल्ल्यावरून कोरोना लसीबाबत मोठी घोषणा करतील असे मानले जात होते. पंतप्रधानांनी यातून परिस्थिती स्पष्ट केली.

लाल किल्ल्यावर मोदी काय म्हणाले?

कोरोनाची लस कधी तयार होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. देशाचे वैज्ञानिक प्रयोगशाळेत अखंडपणे तपस्या करत आहेत, संशोधन करत आहेत. भारतात एक नाही, दोन नाही तर तीन तीन लस तयार होत आहेत. त्यांची चाचणी होत आहे. त्यांना वैज्ञानिकांकडून परवानगी मिळाल्यानंतर तातडीने मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाईल. लस तयार झाल्यावर प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार आहे, असे मोदी म्हणाले.

भारतात या तीन लसींवर काम सुरू आहे

व्हॅक्सीनकंपनी
को-व्हॅक्सीनभारत बायोटेक और आईएमआर
ZyCoV-Dजायडस कैडिला
कोविडशील्ड (AZD 1222)सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया और ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका

तीन लसींची सध्या स्थिती काय आहे?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संशोधनानुसार, भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि जायडस कॅडिलाची ZyCoV-D चे पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी झाली आहे. लवकरच याची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू होईल.

ऑक्सफोर्ड लसच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे. एका आठवड्यात 17 ठिकाणी त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...