आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Modi Says Made In India Should Be Credited Globally, Only Quality Will Increase The Strength Of The Product

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेट्रोलॉजी कॉन्क्लेवमध्ये मोदी:पंतप्रधान म्हणाले - मेड इन इंडियाची जागतिक स्तरावर विश्वासार्हता जपली पाहिजे, क्वालिटीनेच प्रॉडक्ट्ची ताकद वाढेल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या देशात सरकारी सेक्टर असो की खासगी सेक्टरमधील सर्व्हिस क्वालिटी चांगली असायला हवी : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय मेट्रोलॉजी कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केले. त्यांनी नॅशनल एन्व्हायर्नमेंटल स्टँडर्ड लॅब, नॅशनल अॅटोमिक टाईमस्केल आणि भारतीय निर्देशक द्रव्याची देखील सुरुवात केली.

यावेळी मोदी म्हणाले की, नवीन दशकातील हा शुभारंभ देशाचा गौरव वाढवणारा आहे. हे नवीन वर्ष आणखी एक उपलब्धता घेऊन आले आहे. शास्त्रज्ञांनी एक नाही तर दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन तयार करण्यात यश मिळवले आहे. देशाच्या शास्त्रज्ञांच्या योगदानावर गर्व आहे. जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू होणार आहे. तसेच मेड इन इंडियाची जागतिक स्तरावर विश्वासार्हता जपली पाहिजे. क्वालिटीनेच प्रॉडक्ट्ची ताकद वाढेल, असे पंतप्रधान म्हणाले.

मोदींच्या 27 मिनिटांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

1. आत्मनिर्भर भारत लक्षात ठेवून पुढे जायचे आहे

CSIR-NPL ने देशाच्या वैज्ञानिक उत्क्रांतीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा सुरुवात गुलामगिरीतून बाहेर पडलेल्या भारताच्या नवनिर्माणावर केली होती. तुमच्या भूमिकेचा आणखी विस्तार झाला आहे. 2047 मध्ये स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील. आत्मनिर्भर भारताचा संकल्प लक्षात घेऊन आपण नवीन बेंचमार्क तयार करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.

2. क्वालिटी स्टँडर्ड्सद्वारे भारतीय उत्पादनाची ताकद निश्चित होईल

मेड इन इंडियाची ग्लोबल डिमांड, ग्लोबल स्वीकारार्हता या दिशेने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्या देशात सरकारी सेक्टर असो की खासगी सेक्टरमधील सर्व्हिस क्वालिटी चांगली असायला हवी. आपले क्वालिटी स्टँडर्ड जगभरात भारत आणि भारताच्या उत्पादनाची ताकद वाढवण्यासाठी गरजेचे आहे.

3. मेड इन इंडियाची जागतिक स्वीकारार्हता व्हावी

आपल्याला फक्त भारतीय उत्पादनांनी जग भरायचं नाही, तर जगभरातील ग्राहकांच्या विश्वासाला आपल्याला पात्र ठरायचे आहे. आपल्याला ब्रँड इंडियाला क्वालिटी आणि क्वान्टिटी अशा दोन्ही पातळ्यांवर विश्वासपात्र ठरवायचे आहे. भारतीय वस्तू खरेदी करणाऱ्या प्रत्येकाचे मन आपल्याला जिंकायचे आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी हे गरजेचे आहे

4. भविष्य संशोधनावर अवलंबून आहे

कोणत्याही प्रगतीशील समाजात संशोधन जीवनाचे नैसर्गिक स्वरूप देखील असते. त्याचे परिणाम व्यावसायिक आणि सामाजिक आहेत. बर्‍याच वेळा संशोधन करत असताना, भविष्यात कशाप्रकारे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. परंतु ज्ञानाचा साठा कधीही वाया जात नाही. आत्म्याप्रमाणे संशोधनही कधी मरत नाही. ग्रेगोर मेंडेल किंवा निकोला टेस्ला यांचे संशोधन त्यांनी जग सोडल्यानंतर उघडकीस आले. पहिल्या महायुद्धासाठी ड्रोनची निर्मिती झाली होती. आज याचा उपयोग वस्तूंची डिलिव्हरी आणि फोटोग्राफीसाठी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...