आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pm Modi । The People Of The Country Have Full Faith In The BJP Government Modi

भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढणार:देशातील जनतेचे भाजप सरकारवर पुर्णपणे विश्वास, गरीबांना लूटणाऱ्यांना आमचे सरकार सोडणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'देशातील भ्रष्टाचार पुर्णपणे नष्ट करण्याची राजकीय इच्छाशक्ती भाजप सरकारमध्ये आहे. भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी त्याचील पाळेमुळे खणून काढली जाऊ शकतात.' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी गुजरात दौऱ्यावर असून, सीबीआय आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या संयुक्त परिषदेत ते बोलत होते.

गेल्या कित्येक दशकांपासून देशात भ्रष्टाचार सुरु आहे. मात्र आता त्याला संपुर्णपणे संपवण्याची वेळ आली असून, नवीन तंत्रज्ञानाचा उपाय हा सर्वोत्तम आहे. हा नवा भारत असून, यामध्ये भ्रष्टाचाराला कोणतेही स्थान नाही. मला देशातील जनतेमध्ये सहा-सात वर्षात विश्वास निर्माण झाला आहे. असे मोदी म्हणाले.

'भ्रष्टाचार हा छोटा असो की मोठा, त्यामुळे कुणाच्या ना कुणाच्या अधिकारांवर गदा येते. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या मुलभुत अधिकारांपासून वंचित राहावे लागते. तसेच त्यामुळे देशाच्या प्रगतीदेखील थांबते. देशातील भ्रष्टाचार हा कितीही मोठा असला तरी, तसेच त्यामागे कितीही शक्ती असली तरी भाजप सरकार त्याला सोडणार नाही.

गेल्या सहा-सात वर्षांमध्ये देशातील नागरिकांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे की, आताचे सरकारने भ्रष्टाचाराला थारा देत नाही. जनतेच्या या विश्वासामुळेच सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग देखील बंद केले आहे. आपल्या या नव्या भारतात भ्रष्टाचाराला कोणतेही स्थान नाही. नव्या भारतात व्यवस्था ही पारदर्शक असावी, परिणामकारक आणि सुलभ असावी.' असे प्रतिपादन मोदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...