आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 मध्ये झालेले युद्ध जिंकायला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी आज नवी दिल्ली येथील नॅशनल वॉर मेमोरियल (NWM) वर सुवर्ण विजय मशाल पेटवली. येथे त्यांचे नेतृत्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत आणि सैन्याच्या तीनही शाखांचे प्रमुख उपस्थित होते. सर्वांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
#WATCH Prime Minister Narendra Modi pays tribute to the fallen soldiers at National War Memorial on the 50th-anniversary of the 1971 India-Pakistan war#VijayDiwas2020 pic.twitter.com/v0sDbwVeQ6
— ANI (@ANI) December 16, 2020
बुधवारपासून देशभरात सुवर्ण विजय वर्ष साजरे केले जात आहे. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये 1971 ची लढाई लढणारे सैनिक आणि शहिदांच्या विधवांचा सन्मान केला जाईल. यासोबतच बँड डिस्प्ले, सेमिनार, प्रदर्शन, फिल्म फेस्टिव्हल, कॉन्क्लेव्ह आणि अॅडवेंचर अॅक्टिव्हिटीही होईल.
चार विजय मशाल पेटवण्यात आल्या
पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्वाळांनी चार विजय मशाली पेटवल्या. या मशाली देशाच्या विविध भागात नेल्या जातील. या मशाल 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या परमवीर चक्र आणि महावीर चक्र विजेत्यांच्या गावातही पोहोचतील. राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार करताना, या सर्व शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या गावांची माती आणली गेली होती.
1971 च्या भारत-पाक युद्धात काय झाले होते?
1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे मुख्य कारण बांग्लादेशला मुक्त करणे हा होता. या युद्धात भारतीय सैन्यानेही भाग घेतला होता. 13 दिवस चाललेल्या या लढाईत पाक सैन्याला पराभवाचा सामना करावा लागला. 16 डिसेंबर 1971 रोजी, पाकिस्तानी जनरल एएके नियाझी यांनी आपल्या 90 हजार सैनिकांसह ढाका येथे मुक्ति वाहिनीसमोर आत्मसमर्पण केले. यासह बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.