आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी शेतकऱ्यांसोबत बातचित केली. 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्या 18 हजार कोटी रुपयाचा निधी ट्रान्सफर करण्याचे निमित्त होते. मात्र पंतप्रधानांच्या मनात बंगाल आणि शेतकऱ्यांचे आंदोलनही होती. ते जवळपास 80 मिनिटे बोलले. यामधून 20 मिनिटे त्यांनी शेतकरी आंदोलनातील मुद्द्यांवर भाष्य केले.
मोदी म्हणाले - सरकार प्रत्येक पावलावर शेतकऱ्यांसोबत उभे आहे. नवीन कायद्यानंतर शेतकरी हवे तिथे आणि जिथे योग्य किंमत मिळेल तिथे आपले पीक विकू शकते. काही लोक भ्रम पसरवत आहेत की, कायद्याने तुमची जमीन जाईल, पण त्यांच्या गोष्टींमध्ये येऊ नका.
शेतकरी आंदोलनावर म्हणाले...
बंगालच्या 70 लाख शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याचे दुःख
मोदींनी म्हटले की, आज देशाच्या 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या बँक खात्यात थेट, एका क्लिकवर 18 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. मला आज या गोष्टीचे दुःख आहे की, माझ्या पश्चिम बंगालच्या 70 लाखांपेक्षा जास्त शेतकरी भाऊ-बहिणींना याचा लाभ मिळू शकला नाही. बंगालच्या 23 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आवेदन दिले आहे. मात्र राज्य सरकारने व्हेरिफिकेशन प्रक्रिया थांबवली आहे.
30 वर्षात बंगालमधील शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यात आलेला नाही
बर्याच शेतकर्यांनी भारत सरकारला थेट पत्र लिहिले आहे, परंतु राज्य सरकारने ते अडकवून ठेवले आहे. ज्यांनी 30-30 वर्षे बंगालवर राज्य केले त्यांनी बंगालला कुठून कुठे नेले आहे. शेतकर्यांना मिळणाऱ्या 2 हजार रुपयांसाठी त्यांनी आवाज उठवला नाही आणि ते आंदोलन करण्यासाठी पंजाबमध्ये गेले. देशातील लोकांना या खेळाबद्दल माहिती नाही का? यावर विरोधकांचे तोंड का बंद झाले आहे.
APMC विषयी बोलणारे केरळमध्ये आंदोलन करत नाही
जे पक्ष पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलत नाहीत, ते येथे दिल्लीत येऊन शेतकऱ्यांविषयी बोलतात. या पक्षांना आजकाल APMC मंड्यांची खूप आठवण येत आहेत. पण केरळमध्ये APMC मंडी नाहीत हे ते वारंवार विसरतात. केरळमध्ये हे लोक कधीच आंदोलन करत नाहीत.
कोट्यावधी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ
आम्ही देशातील शेतकर्यांची इनपुट किंमत कमी करण्याच्या उद्देशाने कार्य केले. सॉयल हेल्थ कार्ड, यूरियाचे कडुनिंब कोटिंग, कोट्यवधी सौर पंपांची योजना यासाठी सुरू झाली. शेतकऱ्याला पीक विमा संरक्षण मिळावे यासाठी सरकारने प्रयत्न केले. पंतप्रधान पीक विमा योजनेचा आज कोट्यावधी शेतकरी लाभ घेत आहेत.
आजचा दिवस का निवडला?
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात कार्यक्रम आयोजित केले जातील. या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश असेल. शेतकऱ्यांसाठी चौपाल बसवण्यात येणार असून त्यांना पंतप्रधानांचे संबोधन दाखवले जाईल. या दरम्यान, भाजपा कार्यकर्ते घरोघरी जाऊन कृषीमंत्र्यांनी कृषी कायद्याविषयी लिहिलेले पत्र वाटप करतील.
दरवर्षी 6 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात
पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी3 हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत 10 कोटी 96 लाख शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कृषी कायद्याच्या गुणवत्तेविषयीही सांगतील, असे त्यांनी सांगितले. 22 डिसेंबरपर्यंत देशभरातील 2 कोटी शेतकर्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे.
शेतकरी आंदोलनाचा आज 30 वा दिवस
कृषी कायद्यांविरोधात दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 30 वा दिवस आहे. सरकारने गुरुवारी अजून एक पत्र लिहून शेतकऱ्यांसोबत बातचित करण्यासाठी दिवस आणि वेळ ठरवण्याचे आवाहन केले. पत्रात लिहिले आहे की, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार गंभीर आहे.
यासोबतच सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की, मिनिमम सपोर्ट प्राइज संबंधित कोणतीही नवीन मागणी जी नवीन कृषी कायद्यांच्या व्याप्तीच्या बाहेर आहे, त्यास वाटाघाटींमध्ये समावेश करणे तर्कसंगत ठरणार नाही. बुधवारीच शेतकऱ्यांनी सरकारचे आधीचे आमंत्रण नाकारले होते. ते म्हणाले की, सरकारच्या प्रस्तावात कोणतीही गुणवत्ता नाही, आपण नवीन अजेंडा आणला तरच बोलणे होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.