आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Modi Paid Tribute To Former Prime Minister Atal Bihari Vajpayee 96th Birthday At Sadaiv Atal Samadhi Location

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अटलबिहारी वाजपेयींची 96 वी जयंती:​​​​​​​कोविंद आणि मोदींनी सदैव अटल येथे जाऊन माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली अर्पण केली; संसदेत एक पुस्तक केले लॉन्च

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीएम मोदी यांनी संसदेत अटलजींवर आधारित 'अटल बिहारी वाजपेयी इन पार्लियामेंट' या पुस्तकाचे लोकार्पण केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज 96 वी जयंती आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सदैव अटल स्मारक गाठले आणि त्यांना पुष्पांजली अर्पित केली. या वेळी गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली. त्याच वेळी पीएम मोदी यांनी संसदेत अटलजींवर आधारित 'अटल बिहारी वाजपेयी इन पार्लियामेंट' या पुस्तकाचे लोकार्पण केले.

राष्ट्रपती कोविंदही पोहोचले

गृहमंत्री अमित शाह यांनीही वाहिली श्रद्धांजली

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही केले स्मरण

देशभरात कार्यक्रम घेतले जातील
भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश असेल. शेतकऱ्यांसाठी चौपाल बसवण्यात येणार असून त्यांना पंतप्रधानांचे संबोधन दाखवले जात आहे. या दरम्यान, भाजपा कार्यकर्ते घरोघरी जाऊन कृषीमंत्र्यांनी कृषी कायद्याविषयी लिहिलेले पत्र वाटप करतील.

बातम्या आणखी आहेत...