आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या बंगालसाठी रविवार उत्साहाने भरलेला असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी अडीच वाजता कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावर मेगा रॅली घेतील. या रॅलीत अभिनेते मिथुन चक्रवर्ती उपस्थित राहणार आहेत. मिथुन हे या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाचे बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी दिला आहे. आज ममता सिलीगुडी आणि दार्जिलिंगमध्येही रॅली करतील.
भागवत यांनी मिथुन यांची मुंबईत भेट घेतली
गेल्या महिन्यात संघाचे प्रमुख मोहन भागवत मुंबईच्या दौर्यावर आले तेव्हाच त्यांनी मिथुन यांची भेट घेतली होती. तेव्हाच मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजपमध्ये सामिल होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार मिथुन चक्रवर्ती ऑक्टोबर 2019 मध्ये नागपूरला गेले होते. यावेळी त्यांनी संघ प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती आणि त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते.
राजकीय तज्ञांच्या मते, अभिनेता म्हणून मिथुन यांची बंगालमध्ये बरीच लोकप्रियता आहे. याचा फायदा घेत भाजप त्यांना उमेदवार बनवू शकते. तथापि, मिथुन अद्याप भाजपमध्ये सामील झाले नाहीत आणि आजच्या सभेत हे चित्र स्पष्ट होऊ शकते.
ममता यांनी 2014 मध्ये मिथुन यांना राज्यसभेवर पाठवले
मिथुन यांना 2014 मध्ये तृणमूल कॉंग्रेसने राज्यसभेचे खासदार केले होते. मात्र, तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी नंतर 2016 मध्ये राजीनामा दिला होता.
आणखी एक तृणमूल आमदार भाजपत प्रवेश करणार
तृणमूलच्या आमदार सोनाली गुहा म्हणाल्या आहेत की, त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोनानी दक्षिण 24 परगणा येथून चार वेळा आमदार राहिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये त्यांचे नाव आल्याने सोनाली यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरवले आहे. त्या म्हणाल्या की जेव्हा ममता दीदी मला सोडू शकतात तेव्हा मी त्यांना का सोडू शकत नाही? मी मुकुल रॉय यांना फोन केला आणि त्यांना सांगितले की, मला निवडणूक लढायची नाही. परंतु मला सन्मानित पद हवे आहे. ते सहमत झाले आणि मी नक्कीच भाजपमध्ये सामील होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.