आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Will Interact With Public Representatives And Officials Through Virtual Medium, Will Discuss About Oxygen, Bed In Hospital, Remedisvir Injection; News And Live Updates

वाराणसीतील कोरोना परिस्थितीचा आढावा:पंतप्रधान मोदी म्हणाले - गेल्या वर्षीच्या अनुभवांमधून शिकत सावध रहा; टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट वर जोर

वाराणसी9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणासाठी लोकांना जागरुक निर्माण करा - मोदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मोदी यांनी ही आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून आयोजित केली होती. सदरील बैठकीमध्ये मोदी यांनी मतदारसंघाच्या रुग्णालयांतील बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अन्य अत्यावश्यक औषधांच्या आढावा घेतला. त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. या बैठकीमध्ये स्थानिक मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी हे पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या वर्षीच्या कोरोना महामारीपासून शिकवण घेत सावध राहायला हवं. मोदी यांच्या मते, वाढत्या कोरोना संक्रमनामुळे स्थानिक प्रशासनाने लोकांची काळजी घेत कॉन्ट्रॅक्ट, ट्रेसिंग आण‍ि टेस्ट करण्यावर भर देण्यास सांगितले.

लसीकरणासाठी लोकांना जागरुक निर्माण करा - मोदी
या आढावा बैठकीमध्ये मोदी यांनी मास्क वापरण्यासोबतच सामाजिक अंतर पाळण्याचे आव्हाणदेखील केले. यासोबतच देशातील 45 वर्षांवरील लोकांमध्ये लसीकरणासाठी जागरुकता निर्माण करण्यास सांगितले. पुढे बोलताना मोदी यांनी देशातील कोरोनाकाळात आपली सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि इतर व्यक्तींचे आभार मानले.

टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंटशिवाय पर्याय नाही
बैठकीमध्ये मोदी यांनी देशात सध्या उपलब्ध बेड्स, व्हेंटिलेटर आदीबाबत आढावा घेत त्याची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले. ते पुढे बोलताना म्हणाले की, देशात सध्या लसीकरणासोबतच चाचणी, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट योग्य पर्याय असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...