आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Will Talk To The Members Of The Women Self Help Groups Via Video Conferencing; News And Live Updates

आत्मनिर्भर महिला शक्तींशी संवाद:पंतप्रधान मोदी महिला बचत गटांच्या सदस्यांशी साधणार संवाद; 1625 कोटी रुपयांच्या निधीची होणार घोषणा!

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार्यक्रमादरम्यान 6 केंद्रीय मंत्र्यांची उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे 'आत्मनिर्भर महिलाशक्तींशी संवाद' या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. ते आज दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधतील. विशेष म्हणजे यामध्ये दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (DAY-NRLM) अंतर्गत बढती मिळालेल्या महिलांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, देशभरातील बचत गटांच्या यशस्वी महिलांच्या कथा प्रसिद्ध केल्या जातील. या कालावधीत कृषी उपजीविकेवर एक हँडबुक देखील जारी केले जाणार आहे.

4 लाख बचत गटांना 1625 कोटी रुपये मिळतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमादरम्यान 4 लाख बचत गटांसाठी 1625 कोटी रुपयांचा निधी जाहीर करतील. दरम्यान, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या PMFME (PM Formalization of Micro Food Processing Enterprises) योजनेअंतर्गत बचत गटांच्या 7500 सदस्यांना 25 कोटी रुपये बियाण्यांसाठी दिले जातील. या योजनेअंतर्गत चालणाऱ्या 75 FPOs (शेतकरी उत्पादक संस्था) ला 4.13 कोटी रुपयांचा निधीही केला जाणार आहे.

कार्यक्रमादरम्यान 6 केंद्रीय मंत्र्यांची उपस्थित
पंतप्रधान मोदी यांच्यासह या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, पशुपती कुमार पारस, साध्वी निरंजन ज्योती, फग्गन सिंह कुलस्ते, कपिल मोरेश्वर पाटील आणि प्रल्हादसिंग पटेलही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...