- Marathi News
- National
- PM Modi's Life Journey Through 55 Paintings, Chief Minister Yogi Inaugurated The Exhibition In Varanasi
55 पेंटिंग्जमधून PM मोदींचा जीवन प्रवास:मुख्यमंत्री योगींनी वाराणसीमध्ये केले प्रदर्शनाचे उद्घाटन; पहा काही खास फोटो
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज एक दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आहेत. सिग्रा येथील रुद्राक्ष इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासावर आधारित 55 चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. दुपारी 4 नंतर ते लखनौला परततील.
दुबईतील एका चित्रकाराने काढलेली चित्रे
दुबईतील चित्रकार अकबर खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासावर 55 चित्रे काढली आहेत. चहा विकण्यापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास या चित्रांमध्ये दाखवण्यात आला आहे. हे प्रदर्शन आजपासून सुरू होणार असून 17 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासावर आधारित 55 चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या एका चित्राकडे पाहताना.
आव्हाने आणि उपलब्धी दर्शविली
या 55 चित्रांपैकी 12 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाशी संबंधित, 32 चित्रे मन की बात संबधित आणि मन की बात पुस्तकातून घेतली आहेत. या पेंटिंग्सची खास गोष्ट म्हणजे जीएसटी, नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राइक सारख्या प्रमुख धोरणात्मक निर्णयांनाही स्थान दिले आहे. या चित्रांमध्ये पीएम मोदींसमोरील आव्हाने आणि त्यांनी मिळवलेले यशही दाखवण्यात आले आहे.
या पेंटिंगमध्ये चित्रकार अकबर खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्याचा फोटो तसेच वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकणाऱ्या मुलाचा फोटो साकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात इथे चहा विकायचे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील पायाभूत सुविधांना चालना मिळाली आहे. गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास जनतेसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रे साकारली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक क्षेत्रात पुरेसा लक्ष देऊन भारताच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहेत. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास ही संकल्पना जगातील सर्व देशांसाठी अतिशय चांगली आहे.
नरेंद्र मोदी चहा विकण्यापासून भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांचे जीवनाचे तत्वज्ञान इतरांना नेहमीच प्रेरणा देत राहील.
पंतप्रधान मोदी यांनी जागतिक पटलावर अमिट छाप सोडली आहे. ते जगभरात भारताची कीर्ती वाढवत आहे. जगातील प्रत्येक देशात त्यांचे चाहते मोठ्या संख्येने आहेत.
पंतप्रधान मोदींच्या जीवनाशी संबंधित ही 55 चित्रे देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
काशीतील बुद्धिजीवी आणि तरुणांनी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये यावे, असे आवाहन भाजप नेत्यांनी केले आहे. आपले खासदार आणि देशाचे पंतप्रधान यांच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रे प्रत्येकाने पहावे.
या पेंटिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. हीराबेन मोदी या वयाच्या 100 व्या वर्षीही पूर्णपणे स्वस्थ आहेत. तसेच त्या आपली सर्व कामे स्वतः करतात.
विविधतेत एकता असलेल्या आपल्या देशातील सर्व जनतेलापंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासोबत घेऊन जात आहेत, असा संदेश या चित्रात देण्यात आला आहे.