आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Modi's 'Mann Ki Baat' Has A Record Of 4 Lakh Dislikes; The Students Said This Is Just The Beginning

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांची 'मन की बात':पीएम मोदींच्या 'मन की बात'ला डिस्लाइकचा विक्रम, तब्बल पावणे 4 लाख डिस्लाइक; विद्यार्थी म्हणाले- ही तर केवळ सुरुवात

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकाने म्हटले- 'विद्यार्थ्यांचे काहीच ऐकेनात आणि म्हणतात माझ्याच मन की बात ऐका'

पंतप्रधान मोदींची अनेक भाषणं हिट होतात. त्यांच्या भाषणांना सभास्थळी तोबा गर्दी होते तसंच टीव्हीवर देखील लाखोंच्या संख्येने त्यांची भाषणं लोक पाहत असतात. मात्र रविवारी ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी साधलेला संवाद लोकांच्या पसंतीस उतरलेला नाही.

मोदींनी यावेळी आत्मनिर्भर भारत आणि लोकलसाठी व्होकल व्हा असा पुनरुच्चार केला. तसेच खेळण्याच्या निर्मितीत स्टार्टअप कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले. मात्र अनेकांना पंतप्रधानांनी मन की बात लोकांच्या पसंतीस उतरलेला नाही.

भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर मन की बात कार्यक्रमाच्या तब्बल पावणे चार लाख डिसलाइक्स आल्या आहेत. चॅनेलच्या कमेंट सेक्शनमध्ये 52 हजारांहून अधिक कमेंट आल्या आहेत. यातील बहुतांश कमेंट नकारात्मक आहेत.

व्हिडिओवर आलेल्या नकारात्मक कमेंट्स
व्हिडिओवर आलेल्या नकारात्मक कमेंट्स
व्हिडिओवर आलेल्या नकारात्मक कमेंट्स
व्हिडिओवर आलेल्या नकारात्मक कमेंट्स
व्हिडिओवर आलेल्या नकारात्मक कमेंट्स
व्हिडिओवर आलेल्या नकारात्मक कमेंट्स

काय म्हणाले होते मोदी?

“जगात खेळण्यांची बाजारपेठ सुमारे ७ लाख कोटींची असली तरी यात भारताचा वाटा अत्यंत कमी आहे. स्टार्टअप मित्र आणि नव्या उद्योजकांनी या क्षेत्रात पाऊल टाकून देशाला खेळण्यांचे हब घडवावे, जेणेकरून बाहेरून खेळण्या मागण्याची वेळ येऊ नये.’

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser