आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:PM मोदींच्या आईचा वयाच्या 100व्या वर्षात प्रवेश, कुटुंबीयांनी सांगितले हिराबांच्या फिटनेसचे रहस्य

गांधीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेसची देशभरात चर्चा आहे. ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासून देशातच नाही तर विदेशातही त्यांच्या फिटनेसची चर्चा आहे. खरे तर फिटनेस ही मोदी कुटुंबाची परंपरा आहे. आज त्यांची आई हिराबा यांचा 100 वा वाढदिवस आहे. मोदींप्रमाणेच हिराबा यांच्या आरोग्याचीही नेहमी चर्चा होते. 100 व्या वर्षात पदार्पण केलेल्या कुठलाही आजार नसलेल्या हिराबांच्या फिटनेसचा तरुणांनी आदर्श घ्यायला हवा. यावेळी दिव्य मराठीने मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्याशी खास संवाद साधत हिराबांच्या आरोग्याचे रहस्य जाणून घेतले.

कोणत्याही प्रकारच्या औषधी घेत नाही

दिव्य मराठीसोबत बोलताना प्रल्हाद मोदी म्हणाले, हिराबांच्या मेहनतीबरोबरच त्यांच्या सकारात्मक विचारांनी त्यांना या वयातही फिट ठेवले आहे. त्यांनी याआधी कोणत्या औषधी घेतल्या नाही आणि आताही घेत नाही. कोणत्याही समस्येवर त्या घरगुती उपचार करतात.

कधीही बाहेर जेवण केले नाही

प्रल्हाद पुढे म्हणाले, आत्ताच्या काळात मोठी माणसेही पाणीपुरी, चाट खाताना दिसतात, मात्र जेवढे मला आठवते आमच्या आईने कधीही बाहेरचे खाल्ले नाही. खाणे तर दूरची गोष्ट आहे त्या बाहेर नाश्तादेखील करत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या कामात व्यस्त असतात. प्रल्हाद सांगतात, जेव्हा आम्ही वडनगरला राहत होतो तिथे सर्वांना वापरण्यासाठी एकच विहीर होती. ही विहीर ठाकूर फार्म अमरकोट गेटजवळ अम्थर माता मंदिराच्या पाठीमागे होती. यास पाधेडी विहीर म्हटले जायचे. आमची आई येथून दिवसातून कमीतकमी दोनदा पाणी काढून घरी आणायची. ती विहीर 15 फुटांपेक्षा अधिक खोल होती.

आपले सर्व काम स्वतः करते

प्रल्हाद पुढे म्हणाले, मेहनत आणि साधे जीवन यामुळे आजही त्यांचे आरोग्य आम्हा मुलांपेक्षा चांगले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत स्वतःचे सर्व काम ती स्वतः करते. नेहमीच त्या साधे जीवन जगतात. त्यांनी दिलेले संस्कारच आहेत कि, आमच्या कुटुंबात फॅशनला जागा नाही. मला आठवत नाही कि कधी कोणी ब्युटी पार्लरला मेकअपसाठी गेले असेल. त्यांच्या सरळ जीवनाचा प्रभाव आमच्यावरही आहे. आम्ही सर्व भाऊ साधे जीवन जगतो. मेहनतीने मार्गक्रमण करत आहोत.

सातत्य आणि धार्मिक स्वभावामुळे स्थिर

प्रल्हाद म्हणतात, आईचा स्वभाव धार्मिक आहे आणि आजही त्यांच्या दररोजच्या नियमांमध्ये पुजापाठ सर्वात वरती आहे. दुपारच्या जेवणानंतर त्या खोलीतून बाहेर येतात. फेरफटका मारल्यानंतर झोक्यावर बसतात. हिराबांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त वडनगर येथे संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी आमचे कुटुंब उपस्थित असेल.

हिराबांच्या चांगल्या आरोग्यासाठी वडनगर येथे नवचंडी यज्ञ

हीराबा 100 व्या वर्षात प्रवेश करत असल्याच्या सम्मानात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे घर असलेल्या व़डनगर येथे नवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यज्ञानंतर वडनगर आणि आजूबाजुच्या 7 हजार गावांमधील मुलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...