आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi's Pakistani Sister Qamar Mohsin Shaikh Sends Him Rakhi, Wishes For His Good Health

पीएम मोदींची पाकिस्तानमधील बहीण:कमर मोहसिन 25 वर्षांपासून बांधत आहेत मोदींना राखी, पण यावर्षी पोस्टाने पाठवली, म्हणाल्या - तुमचे पुढचे 5 वर्ष चांगले जावेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोहसिन म्हणाल्या - पहिल्या भेटीत मोदी मला बहीण म्हणाले, मलाही भाऊ नव्हता
  • 'एकदा रक्षाबंधनच्या दिवशी प्रार्थना केली होती की, नरेंद्र मोदी गुजरात मुख्यमंत्री बनावे'

कमर मोहसिन शेख... यांना पंतप्रधान नेरंद्र मोदींची पाकिस्तानची बहीण म्हणून ओळखले जाते. हे नाते कसे तयार झाले आहे? याविषयी पुढे सांगणारच आहोत, मात्र यापूर्वी जाणून घेऊया कमर मोहसिन कोरोनाच्या निर्बंधांमुळे यावेळी रक्षाबंधनला मोदींना भेटू शकणार नाही. यामुळे त्यांनी पोस्टाने राखी पाठवली आहे.

पाकिस्तानात वाढल्या आहेत मोहसिन, मोदींच्या बहीण अशा बनल्या
मोहसिन या लग्नानंतर अहमदाबादमध्ये सेटल झाल्या. त्यांनी सांगितले की, 'मी मोदींना गेल्या 30-35 वर्षांपासून ओळखते. पहिल्यांदा भेट झाली होती. तेव्हा त्यांना कळाले की मी कराची येथून आहे आणि अहमदाबादमध्ये लग्न झाले आहे. तर ते मला बहीण म्हणाले. माझाही कुणी भाऊ नव्हता. यामुळे काही वर्षांनंतर रक्षाबंधनला आम्ही पुन्हा दिल्लीला गेलो तर मी त्यांना राखी बांधली. गेल्या 25 वर्षांपासून मी त्यांना राखी बांधतेय.'

रक्षाबंधनाला मोदींनी सीएम बनावे यासाठी प्रार्थना केली होती
'एकदा राखी बांधताना मी म्हणाले होते की, तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री बना, मी प्रार्थना करेल. त्यावेळी त्यांनी हे हसून टाळले होते, नंतर ते मुख्यमंत्री बनले. पुढच्या रक्षाबंधनला मी म्हणाले की, देवाने माझी प्रार्थना ऐकली... आणि आता ते पंतप्रधान बनले आहेत'

मोदी भाईंना राखी मिळाली
'मी पाठवलेली राखी आणि पुस्तक त्यांना मिळाले आहे. मला स्वतःलाच जायचे होते, पण कोरोना व्हायरसमुळे सर्व त्रस्त आहेत. मी प्रार्थना करते की, त्यांचे पुढचे 5 वर्ष चांगले जावेत. त्यांचे सकारात्मक निर्णय सर्व जगाला कळावे. मी त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करेल.'

बातम्या आणखी आहेत...