आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मन की बात:शेतकऱ्यांनी हवे तेथे पीक विकावे, एपीएमसी कायद्याने केला मोठा बदल; या विधेयकांमुळे फायदाच : मोदी

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपली गावे अन् मजबूत शेतकरी हाच आत्मनिर्भर भारताचा पाया : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या ६९ व्या भागाद्वारे देशवासीयांना संबोधित केले. त्यांनी पुन्हा एकदा कोरोनाचा उल्लेख करत लोकांना दोन मीटर अंतराच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले. या संकटामुळे कुटुंबे जोडली गेली, असा उल्लेखही त्यांनी केला. पंतप्रधानांनी नवी कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत, असा विश्वास देताना म्हटले की, या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान नव्हे, तर फायदाच होईल. त्यांना जेथे जास्त दर मिळेल तेथे ते आपली पिके-फळे विकू शकतील. देशाचे कृषी क्षेत्र, आपले शेतकरी, आपली गावे हीच आत्मनिर्भर भारताचा पाया आहेत. ते मजबूत झाले तर आत्मनिर्भर भारताचा कणा मजबूत होईल. त्यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण आणि राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या योगदानाची आठवण करून दिली. या सर्व मान्यवरांची पुढील महिन्यात जयंती आहे.

शेतकऱ्यांनी हवे तेथे पीक विकावे, एपीएमसी कायद्याने केला मोठा बदल; या विधेयकांमुळे फायदाच : माेदी

शेतीत होणाऱ्या बदलाबद्दल विचारणा करणारी अनेक शेतकरी, संघटनांची पत्रे मला मिळत आहेत. हरियाणातील शेतकरी किसन चौहान यांना मंडईबाहेर फळे-भाज्या विकण्यास अडचण येत होती, वाहने जप्त होत होती, असे सांगितले. २०१४ मध्ये एपीएमसी कायद्यात बदल झाले. त्यांनी एक गट तयार केला. आता त्यांची फळे-भाज्यांचा पुरवठा पंचतारांकित हॉटेलला होत आहे. पुणे, मुंबईत शेतकरी आठवडी बाजार स्वत: चालवतात,असे मोदी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...