आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

70 वी मन की बात:वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावा, यंदा खरेदी करताना स्थानिक गोष्टींना प्राधान्य द्या; पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी म्हणाले - कोरोना दरम्यान आगामी सणासुदीच्या काळात संयमाने रहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित केले. मोदींचा हा 70 वा मन की बात या कार्यक्रम आहे. यावेळी त्यांनी दसऱ्याच्या मुहुर्तावर सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोना काळात आणखी बरेच सण येणार आहेत, त्यावेळी देखील आपण संयमाने राहिले पाहिजे असे मोदी म्हणाले. बाजारात काही खरेदी करायला जाताना स्थानिक गोष्टींना प्राधान्य देण्याचे मोदींनी यावेळी आवाहन केले.

मोदींच्या भाषणातील महत्तवाचे मुद्दे

पंतप्रधानांचा पोन मरियप्पन यांच्याशी तामिळ भाषेत संवाद

पोन मरियप्पन हे तामिळनाडूतील तुतुकुडीमध्ये एक सलून चालवतात, त्यांनी त्यांच्या सलूनचा एक भाग पुस्तकालयात परिवर्तीत केला आहे. पंतप्रधानांनी पोन यांच्याशी तामिळ भाषेत संवाद साधला

भारतातील मल्लखांब विदेशात प्रसिद्ध.

भारतातील मलखांब विदेशात प्रसिद्ध आहे. मलेशिया, पोलंड आणि जर्मनीसह 20 देशांमध्ये मल्लखांब शिकवला जात आहे. त्याची जागतिक स्पर्धाही होते. तसेच, योगाचाही विदेशात मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे.

मेक्सिकोत खादीची निर्मिती

खादीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मेक्सिकोत खादीला मोठी मागणी, मेक्सिकोत खादीची निर्मिती, महात्मा गांधींच्या सिनेमामुळे प्रभावित होऊन मेक्सिकोत युवकाचा खादी व्यवसायाकडे कल वाढत चालला आहे.

प्रत्येक घरात वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावा

सणांमध्ये सीमेवर असलेल्या सैनिकांनाही लक्षात ठेवा. आम्हाला प्रत्येक घरात या वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावायचा आहे.

लोकल फॉर व्हॉकलला लक्षात ठेवा

यंदा खरेदी करताना लोकल फॉर व्हॉकलला लक्षात ठेवा, कोरोना काळात सतर्कता बाळगा, स्वदेशीला प्राधान्य द्या, असे आवाहनही मोदींनी केले.