आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. यापूर्वी त्यांनी निवेदन जारी करुन ते म्हणाले की, हा दौरा अमेरिकेसोबत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्याची संधी असेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'मी अमेरिकेचे महामहिम राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावर 22-25 सप्टेंबर, 2021 पर्यंत USA चा दौरा करेल. या दरम्यान मी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासोबत जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि परस्पर क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्द्यांवर विचार मांडेन. मी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना भेटण्यासाठी देखील उत्सुक आहे. हॅरिस यांच्यासोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान सेक्टरमध्ये सहयोगाच्या करारांवर चर्चा होईल.'
पंतप्रधान म्हणाले की, 'मी राष्ट्राध्यक्ष बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगा यांच्यासह वैयक्तिकरित्या क्वाड लीडर समिटमध्ये उपस्थित राहणार आहे. ही शिखर परिषद मार्चमध्ये झालेल्या व्हर्चुअल शिखर परिषदेच्या निकालाचा आढावा घेण्याची संधी आहे. तसेच भारत-प्रशांत क्षेत्रासाठी आपल्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित भविष्यातील पावलांवर चर्चा होईल.
बायडेन यांच्या व्यतिरिक्त मोदी इतर नेत्यांना भेटतील
मोदी म्हणाले की, मी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान सुगा यांनाही भेटेन. या दरम्यान देशांसोबत मजबूत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला जाईल प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर सहकार्याविषयी चर्चा होईल. मी संयुक्त राष्ट्र महासभेत संबोधन करुन आपल्या यात्रेचा समारोप करेल. ज्यामध्ये कोरोना महामारी, दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या समस्यांसह जागतिक आव्हानांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
फोनवरही चर्चा होत राहिली
बायडेन यांनी 20 जानेवारी रोजी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यानंतर, भारताच्या पंतप्रधानांशी त्यांची ही पहिली समोरासमोरची भेट असेल. तसेतर, दोघांमध्ये तीन व्हर्चुअल बैठका झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी 17 नोव्हेंबर 2020 रोजी बायडेन यांना फोन केला होता. या दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यानंतर 8 फेब्रुवारी आणि 26 एप्रिल रोजी दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली. कमला हॅरिस यांनी 3 जून रोजी मोदींशी फोनवर चर्चा केली. सप्टेंबर 2019 मध्ये मोदींनी शेवटचा अमेरिकेचा दौरा केला. तेव्हा त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत हाउडी मोदी कार्यक्रमात भाग घेतला होता. यानंतर कोविडचा दौरा सुरू झाला. मोदींनी या काळात फक्त मार्च महिन्यात बांगलादेश दौरा केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.