आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • PM Narendra Modi And Actor Ayushmann Khurrana In Time Magazine List Of 100: Know Who Are Most Influential People?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:टाइम : 100 व्यक्तींत आयुषमान, शाहीनबाग आजी; मोदींवर ताशेरे-महामारीच्या नावाने विरोध दडपला

दिल्ली/मुंबई7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • भारतात मुस्लिमांना निशाणा बनवण्यात आले : टाइम
 • 82 वर्षीय शाहीनबागच्या आजी, तिरंगा घेऊन आंदोलन

अमेरिकेच्या टाइम नियतकालिकाने बुधवारी जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी जारी केली. पीएम नरेंद्र मोदी, अभिनेता आयुषमान खुराना, शाहीनबागच्या आजी बिल्किस बानो, गुगल सीईओ सुंदर पिचाई व एचआयव्हीचे संशोधक प्रो. रवींद्र गुप्तांचा यादीत समावेश आहे. माेदींवर तिखट टिप्पणी करत म्हटले की, ‘विरोध दडपण्यासाठी त्यांची हिंदू राष्ट्रवादी भाजपला महामारीचा बहाणा मिळाला. अशा पद्धतीने जगातील सर्वात जिवंत लोकशाही अंधारात लोटली गेली आहे.’

भारतात मुस्लिमांना निशाणा बनवण्यात आले : टाइम

टाइमने लिहिले, भारताचे बहुतांश पंतप्रधान हिंदू आहेत. मात्र फक्त मोदी हेच दुसऱ्यांना काही महत्त्व नाही, असे वागतात. त्यांच्या हिंदू राष्ट्रवादी भाजपने उमदेपणा झिडकारला. मुस्लिमांना निशाणा बनवले गेले.

८२ वर्षीय शाहीनबागच्या आजी, तिरंगा घेऊन आंदोलन

बिल्किस बानो (८२) दिल्लीच्या शाहीनबागेत नागरिकत्व कायद्यािवरुद्ध आंदोलनात हाती तिरंगा घेऊन सकाळपासून रात्रीपर्यंत बसत. कार्यकर्त्यांना धीर देत लोकशाही वाचवणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी दाखवले.

समाज बदलण्याचा प्रयत्न : आयुषमान

‘दैनिक भास्कर’कडे आयुषमान म्हणाला, ‘सिनेमाद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. जो कंटेंट निवडला त्यातून लाेकांना काहीतरी देण्यात यशस्वी ठरलोय. लोक- समाजात एखाद्या मुद्द्यावर चर्चेला ‘ट्रिगर’ करणे व बदल घडवण्याची मोठी शक्ती सिनेमामध्ये आहे.’

एचआयव्हीग्रस्तांची आशा प्रो. रवींद्र गुप्ता

प्रोफेसर रवींद्र गुप्ता यांच्या संशोधनामुळे यूकेतील पहिला एचआयव्ही रुग्ण बरा झाला. या रुग्णाने लिहिले की, ‘गुप्ता हे जगभरातील एचआयव्ही रुग्णासाठी आशेचा किरण आहेत.’

टाईम यादीत 10 मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश

 • नरेंद्र मोदी, पंतप्रधान
 • डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्रपती
 • जो बाइडेन, अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणूकीत उमेदवार
 • कमला हॅरिस, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार
 • नॅन्सी पॅलोसी, अमेरिकेचे प्रतिनिधी सभागृह अध्यक्ष
 • अँजला मर्केल, जर्मनीचे कुलपती
 • शी-जिनपिंग, चीनचे राष्ट्रपती
 • नाओमी ओसाका, जपानची टेनिसपटू
 • सुंदर पिचाई, गुगलचे सीईओ
 • आयुष्मान खुराणा, अभिनेता
 • रवींद्र गुप्ता, केंब्रिज विद्यापीठातील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक
बातम्या आणखी आहेत...