आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेह दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेला हिंसाचार आणि एलएसीवर वादाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. गलवान येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसाचारात भारताचे 20 सैनिक शहीद झाले. तेव्हापासूनच दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू आहेत. त्यात अचानक लेह दौरा करून मोदींना सर्वांनाच धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी पोहोचले ते ठिकाणी चीनपासून 250 किमी दूर आहे. नीमू येते पोहोचल्यानंतर मोदींनी जवानांसोबत काढलेला फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
मोदींच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे सुद्धा उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी पोहोचून भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
संरक्षण मंत्री करणार होते दौरा, मोदीच पोहोचले
उल्लेखनीय बाब म्हणजे, या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा गुरुवारीच दौरा होणार होता. परंतु, काही कारणास्तव हा दौरा पुढे ढकलण्यात आला. त्यात शुक्रवारी संरक्षण मंत्री नीमू येथे पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचले. चीनच्या मुद्द्यावर विरोधकांनी वेळोवेळी मोदींवर निशाणा साधला. मोदींचा हा दौरा विरोधी पक्षांसाठी एक उत्तर म्हणूनही पाहिला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लडाखच्या नीमू येथे आहेत. या ठिकाणी ते शुक्रवारी सकाळी 8.30 वजता पोहोचले. यानंतर येथील आहेत. भारतीय लष्कर, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवान अधिकाऱ्यांना संबोधित केले. ही जागा समुद्र सपाटीपासून 11 हजार फुट उंचीवर आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेला हा परिसर झंस्कार रेंजने व्यापला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.