आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Birthday Updates; 2 Crore Covid 19 Vaccine Doses Target Set By BJP Today; News And Live Updates

​​​​​​​मोदींच्या वाढदिवसाला रेकॉर्ड लसीकरण:देशात 9 तासांत 2 कोटी लोकांचे लसीकरण, प्रत्येक सेकंदाला दिले गेले 527 पेक्षा जास्त डोस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यांना 77.77 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71 वा वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर देशात आज लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे फक्त 9 तासांत देशातील 2 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात सध्याही लसीकरण सुरु असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी दुपारी दीड वाजेपर्यंत 1 कोटी लोकांना लस देण्यात आली होती. प्रत्येक सेकंदला 527 पेक्षा जास्त लोकांना लस दिली जात आहे. एका तासाला 19 लाख लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यावरुन लसीकरणाची गती किती असेल याचा अंदाज येईल.

राज्यांना 77.77 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचे 77.77 कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले आहे. विशेष म्हणजे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या लसीचे 6.17 कोटींपेक्षा जास्त डोस आहेत.

चौथ्या दिवशी एक कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले
देशात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती वाढली आहे. यापूर्वी 27 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर रोजी देशात एक कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आले होते. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी देशातील लसीकरण मोहिमेला गती देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींसाठी ही वाढदिवसाची सर्वोत्तम भेट असणार आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांना लसीचा डोस द्यावा असे निर्देश भाजपने देशभरातील आपल्या युनिट्सना दिले होते.

बातम्या आणखी आहेत...