आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Cabinet Meeting Live News Updates; Jyotiraditya Scindia | Anupriya Patel Anurag Thakur, Modi Cabinet Expansion

बदलानंतर कामकाज सुरू:टीम मोदीमध्ये सर्वात मोठ्या विस्तारानंतर पहिली कॅबिनेट बैठक संपली, 23 हजार कोटींच्या हेल्थ इमरजेंसी पॅकेजची घोषणा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या बैठकीमध्ये LIC का IPO आणण्यावर निर्णय होऊ शकतो असे मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मंत्रिमंडळातील मोठ्या बदलांनंतर मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक होती. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी 7 वाजता मंत्रीपरिषदेची बैठक होईल. ही बैठक व्हर्चुअली झाली. यात सर्व 30 कॅबिनेट मंत्री सहभागी झाले होते.

बैठकीनंतर 3 मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. सरकारने 23 हजार कोटींचे हेल्थ इमरजेंसी पॅकेजही जाहीर केले आहे. यात 15 हजार कोटी रुपये केंद्र सरकारचे असतील. 8 हजार कोटी रुपये राज्यांना देण्यात येतील.

पहिल्या पॅकेजच्या वापराचे कौतुक केले
आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया म्हणाले - 2020 मध्ये कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सरकारने पहिले पॅकेज 15 हजार कोटींचे दिले होते. याच्या मदतीने, कोविड डेडिकेटेड रुग्णालये 163 वरून 4,389 पर्यंत वाढली. पूर्वी कोणतीही कोविड आरोग्य केंद्रे नव्हती, आता 8,338 आहेत. कोविड केअर सेंटरची संख्या वाढून 10 हजार झाली आहे. ऑक्सिजन बेड 4 लाखांपेक्षा जास्त झाले आहेत.

हा निधी चांगला उपयोगात आणला गेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या अडचणी आपल्या समोर आल्या त्या लक्षात घेता. 23 हजार कोटींचे नवीन पॅकेज आणले आहेत. केंद्र 15 हजार कोटी रुपये खर्च करेल आणि राज्य सरकारांना 8 हजार कोटी दिले जातील.

मुलांना कोरोनापासून संरक्षण देण्यावर भर
भविष्यात देशात ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये, आवश्यक औषधांची कमतरता असू नये आणि मुलांना संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी काय केले पाहिजे या विचारात हे पॅकेज देण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. सेंट्रल आणि इंटीग्रेटेड डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या पॅकेजचा वापर करुन आपण कोविडचा सामना करु. टेली मेडिसिन आणि टेली कंसल्टेशनवर फोकस केले जाईल.

जुलै ते मार्च या कालावधीत प्रत्येक राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कम्यूनिटी आरोग्य केंद्र स्तरावर बेड बनवण्याची तरतूद आहे. 20 हजार आयसीयू बेड बनवण्यासाठी देखील पॅकेजची व्यवस्था असेल. मुलांना लक्षात ठेवून या आयसीयूमध्ये एक हायब्रि़ड व्यवस्था असेल.

नारळ मंडळ तयार, 2 कोटी पर्यंत कर्ज जाहीर
नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला की मंड्यांमार्फत एक लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतील. यासह नारळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी नारळ कायद्यात महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत नारळ बोर्ड बनवला जाईल. त्याचे सीईओ राजकीय व्यक्ती होणार नाहीत. यावेळी अर्थसंकल्प आला होता तेव्हा म्हटले होते की, मंड्या मजबूत होतील. राज्य सरकार आणि सहकारी महासंघ, बचतगट आणि एपीएमसी एक लाख कोटींच्या पायाभूत सुविधांच्या निधीस पात्र असतील.

ते म्हणाले की, एग्री स्टार्टअप, शेतकर्‍यांच्या गटाला दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जात 3% व्याज सूट देण्यात येईल. जर एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त प्रकल्प केले तर या प्रकल्पांची कमाल मर्यादा 25 होऊ शकते आणि ती वेगवेगळ्या भागात होईल. यावर दोन कोटी रुपयांचे स्वतंत्र कर्ज दिले जाईल आणि व्याज माफ केले जाईल. जर शेतीमाल बाजारपेठेतील शेतकर्‍यांसाठी एकापेक्षा जास्त प्रकल्प घेऊन येत असेल तर त्यांनाही असे कर्ज दिले जाईल.

एक दिवस आधी केला सर्वात मोठा विस्तार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताच्या इतिहासात प्रथमच मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये 43 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. दीड तास चाललेल्या शपथविधीत 36 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. नवीन मंत्र्यांमध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेशातील 7 आणि त्यानंतर गुजरातमधील 3 नवीन मंत्र्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्याच्या मंत्र्यांपैकी 7 जणांना बढती देण्यात आली आहे.

मोदींनी यांना प्रमोट केले
अनुराग ठाकूर, जीके रेड्डी, मनसुख मंडावीया, किरेन रिजिजू, आरके सिंग, हरदीपसिंग पुरी आणि पुरुषोत्तम रुपाला यांना पदोन्नती मिळाली आहे. हे सर्व 7 राज्यमंत्री होते, त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे.

मंत्र्यांनी पदभार स्वीकारला
गुरुवारी पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, अनुप्रिया सिंह पटेल, पशुपती कुमार पारस, निशीथ प्रमाणिक, अजय कुमार यांनी कार्यभार स्वीकारला.

बातम्या आणखी आहेत...