आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात प्रथमच आयोजित अखिल भारतीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या बैठकीत सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी एकत्र स्टेज शेअर करण्याची ही पहिलीच वेळ होती. मोदी म्हणाले- आमच्या गावागावात लोक ऑनलाइन पेमेंटला प्राधान्य देत आहेत. जगातील ऑनलाइन पेमेंटपैकी चाळीस टक्के पेमेंट भारतात होते. यामध्ये आपण आघाडीवर आहोत.
मोदींनी श्लोकाचे म्हणून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले–अङ्गेन गात्रं नयनेन वक्त्रं न्यायेन राज्यं लवणेन भोज्यं। म्हणजेच ज्याप्रमाणे विविध अवयवांनी शरीराची, डोळ्यांनी चेहऱ्याची, मिठाने अन्नाची सार्थकता पूर्ण होते, त्याचप्रमाणे न्यायाने शासनाची सार्थकता होते. आपल्या देशातील सामान्यातील सामान्य माणसाचा असा विश्वास आहे की, जेव्हा कोणीही ऐकणार नाही, तेव्हा न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. न्यायाच्या या विश्वासामुळेच प्रत्येक देशवासीयाला वाटते की देश आपल्या हक्कांचे रक्षण करत आहे.
मला सांगण्यात आले आहे की, आपल्या देशात एक कोटीहून अधिक खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा न्यायालयांमध्ये होते. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्येही साठ लाख खटल्यांची सुनावणी झाली आहे. हा एक चांगला संदेश आहे की, आपण स्वतःला सतत बदलत असतो. याचे श्रेय तुम्हा सर्वांना जाते. मोदींनी स्मित करत म्हटले की, तुम्हा सर्वांमध्ये (न्यायाधीश) येणे खूप आनंददायी आहे, परंतु बोलणे कठीण होऊन जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.