आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेक न्यूज एक्सपोज:उद्योगपती अदाणींच्या पत्नीसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी का झुकले? जाणून घ्या सत्य

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दावा केला जात आहे की, फोटोमध्ये दिसणारी महिला उद्योगपती गौतम अदाणी यांच्या पत्नी आहेत.

काय होत आहे व्हायरल : सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा एका महिलेसोबत फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये मोदी महिलेसमोर मान झुकवलेले दिसत आहे. असा दावा केला जात आहे की, फोटोमध्ये दिसणारी महिला उद्योगपती गौतम अदाणी यांच्या पत्नी आहेत.

सत्य काय आहे?
व्हायरल फोटो गूगल रिवर्स सर्च केल्यानंतर आम्हाला अमर उजाला वेबसाइटवर 2 वर्षे जुने आर्टिकल सापडले. या आर्टिकलमध्ये ही महिला पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त इतर मोठ्या व्यक्तींसोबतही फोटोंमध्ये आहे.

  • अमर उजालाच्या आर्टिकलमधून समजते की, या फोटोमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव दीपिका मॉन्डल आहे. दीपिका 'दिव्य ज्योती कल्चरल ऑर्गेनाइजेशन अँड वेल्फेयर सोसायटी' नावाच्या NGO ची चीफ फंक्शनरी ऑफिसर आहे.
  • वन इंडिया.कॉमच्या एका आर्टिकलमध्ये ही महिला सामाजिक कार्यकर्ता दीपिका मॉन्डल असल्याचे सांगण्यात आले.
  • मोदींसोबत दिसणाऱ्या महिलेला उद्योपती गौतम अदाणींच्या पत्नी संबोधले जात आहे. इंटरनेटच्या विश्वसनीय सोर्सवरर आम्ही गौतम अदाणींच्या पत्नीचा फोटो सर्च करण्यास सुरुवात केली. आम्हाला आउटकुलच्या वेबसाइटवर गौतम अदाणी आणि त्यांच्या पत्नीचा एकत्र फोटो सापडला.

आउटलुक वेबसाइटवर दिलेल्या कॅप्शनवरुन कळते की, हा फोटो गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळचा आहे. जेव्हा गौतम अदाणी आणि त्यांच्या पत्नी एकत्र मदतानासाठी गेले होते. स्पष्ट आहे की, सोशल मीडियावर एका फोटोविषयी केला जाणारा दावा फेक आहे.

बातम्या आणखी आहेत...