आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर आहेत. चेन्नई त्यांनी 118 हायटेक अर्जुन टँक (MK-1A) सैन्याकडे सुपुर्त केले. यावेळी पंतप्रधानांनी सलामी देखील दिली. यावेळी लष्कर प्रमुख एमएम नरवणे उपस्थित होते. या टँकला DRDO ने 8400 कोटींमध्ये तयार केले आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, "आजचा दिवस कोणताही भारतीय विसरू शकत नाही. दोन वर्षांपू्र्वी आजच्या दिवशी पुलवामात हल्ला झाला होता. आम्ही त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली देतो, ज्यांनी त्या हल्ल्या आपले प्राण गमावले. आम्हाला आमच्या सुरक्षा दलांचा अभिमान आहे. त्यांचे धैर्य पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आज मी देशामध्ये तयार आणि डिझाइन केलेले अर्जुन मेन बॅटल टँक देशाला सोपवले आहे."
पंतप्रधानांनी चेन्नईत म्हटले की, "वणक्कम चेन्नई, वणक्कम तमिळनाडू. हे शहर ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेले आहे. येथे केलेल्या जोरदार स्वागताबद्दल आभार. तुमच्या प्रेम आणि आपुलकीने भारावून गेलो आहे. आम्ही चेन्नईमध्ये 3 पायाभूत सुविधा प्रकल्पांची सुरुवात केली. हे प्रकल्प देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. ते तामिळनाडूचा विकास दाखवतात."
चेन्नईमध्ये या प्रकल्पांचा शुभारंभ केला.
- चेन्नई मेट्रो रेल्वे फेज-1 विस्ताराचे उद्घाटन झाले. - रेल्वे विद्युतीकरणाचे उद्घाटन
- लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (MK-1A) सुपुर्द केले.
- ग्रँड एनीकट कालवा यंत्रणेचे नूतनीकरण, विस्तार व मोर्डेनायझेशनचा पाया घातला गेला.
आता या योजना कोचीमध्ये सुरू होतील
- कोचीमध्ये BPCL च्या 6 हजार कोटी रुपयांची प्रोपलीन डेरिव्हेटिव्हज पेट्रोकेमिकल्स प्रकल्प.
- कोचीन बंदरावर 25 कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सागरिका.
- कोचीन बंदरातील नूतनीकरणाच्या व विस्तारीकरणाच्या कामाची पायाभरणी केली जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.