आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या भाषणात 8 वेळा गदारोळ:लोकसभेत पंतप्रधान म्हणाले - शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचे काम 'आंदोलनजीवीं'नी केले, त्यांच्यापासून देशाला वाचवणे आवश्यक

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. या दरम्यान काँग्रेस खासदार सभात्याग करत सभागृहातून बाहेर पडले. मोदींच्या भाषणादरम्यान 8 वेळा गदारोळ झाला आहे. सहाव्या वेळी झालेल्या गदारोळानंतर मोदी संतापले. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना म्हणाले की, हे जरा जास्तच होतंय, मी तुमचा आदर करतो.

कृषी कायद्यांविषयी बोलताना मोदींनी पुन्हा एकदा आंदोलनजीवीचा मुद्दा छेडत विरोधकांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांचे आंदोलन पवित्र असल्याचे मी मानतो. पण, शेतकऱ्यांच्या या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचे काम हे आंदोलनजीवी करत आहेत. त्यांच्यापासून देशाला वाचवणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.

मोदी विरोधकांना म्हणाले की, आतापर्यंत लहान शेतकऱ्यांची उपेक्षा झाली आहे. जर छोटे शेतकरी जागे झाले तर तुम्हालाही (विरोधकांना) उत्तर द्यावे लागेल.

पंतप्रधान मोदी कृषी कायद्यांवर बोलताना म्हणाले की, 'या कोरोना काळात 3 कृषी कायदे देखील आणले. कृषी सुधारणेची ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. वर्षानुवर्षे आपल्या शेती क्षेत्राला आव्हानांचा सामना करावा लागत होता, त्यातून सावरण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. भविष्यातील आव्हानांना देखील आपल्याला सामोरे जावे लागेल. मी पाहत होतो की, येथे काँग्रेसच्या सहकार्यांनी चर्चा केली की ते कायद्याच्या रंगावर तो काळा आहे की पांढरा यावर वाद घालत होते. त्यांनी कंटेंटवर चर्चा केली असती तर बरे झाले असते. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचली असती.'

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'आता राहिला प्रश्न आंदोलनाचा तर ते गैरसमजांना बळी पडले आहेत. (गोंधळ होताच मोदी म्हणाले...) माझे भाषण पूर्ण झाल्यानंतर हे सर्व करा, तुम्हाला संधी मिळाली होती. तुम्ही शेतकऱ्यांबद्दल काही चुकीचे शब्द बोलू शकता, आम्ही तसे नाही करू शकत. (मोदींना बोलतान थांबवले तर ते म्हणाले...) मी किती सेवा देतो ते पहा. तुम्हाला जेथे नोंदणी करायची होती, तेथे झाली आहे.'

पंतप्रधानांनी काँग्रेसवर साधला निशाणा

यावेळी कृषी कायद्यांची बाजू मांडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसच्या खासदारांकडून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न सुरु होता. तेव्हा संतापलेल्या नरेंद्र मोदी यांनी भर लोकसभेत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही, अशी टीका मोदींनी केली. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे, असेही ते म्हणाले.

देशातील सर्वात जुन्या पक्षाची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे. या पक्षाचे खासदार राज्यसभेत एक भूमिका घेतात आणि लोकसभेत दुसरीच भूमिका घेतात. राज्यसभेतील खासदार चर्चा आणि वादविवाद करतात. पण काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांची भूमिका याच्या अगदी उलट असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

कोरोना काळात देश स्वतः सावरला, जगालाही सावरले

मोदी म्हणाले की कोरोना काळात भारताने स्वत: सावरला आणि जगाला सावरण्यास मदत केली. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, ''राष्ट्रपतीजींचे भाषण हे भारतातील130 कोटी नागरिकांच्या संकल्प शक्तीचे प्रतिबिंब आहे. बिकट आणि विपरीत परिस्थितीत सुद्धा हा देश कशा प्रकारे आपला मार्ग निवडतो, निर्णय घेतो आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीतून ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर पुढे जातो, या सर्व गोष्टी राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सविस्तरपणे सांगितल्या. त्यांचा एक-एक शब्द देशवासियांमध्ये एक नवीन विश्वास प्रस्थापित करणारा आहे. आपण त्यांचे जितके आभार मानू ते कमी आहेत.'