आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालमध्ये मोदी:TMC ने अनेक फाउल केले, येथील लोक लवकरच त्यांना राम कार्ड दाखवणार; पंतप्रधान मोदींचे ममता बॅनर्जींवर टीकास्त्र

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तृणमूल काँग्रेसच्या छुप्या मित्रांपासून सावध राहा, मोदींचा भाजपच्या कार्यकर्त्यांना सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (7 फेब्रुवारी) आसाम आणि पश्चिम बंगालचा दौरा केला. मोदी संध्याकाळी पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे पोहोचले. येथील प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की, बंगाल फुटबॉलवर प्रेम करणारे राज्य आहे, यामुळे फुटबॉलच्या भाषेत सांगू इच्छितो की तृणमुलने अनेक फाउल केले आहेत. बंगालचे लोक सर्वकाही पाहत आहेत. यामुळे बंगालचे लोक लवकरच तृणमुलला राम दाखवतील. तुम्ही लोकांनी आत्या आणि भाचावाद संपवण्याचे ठरवले आहे.

पंतप्रधानांनी हल्दियामध्ये LPG इम्पोर्ट टर्मिनलची सुरूवात केली. याची अंदाजित किंमत 1100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर त्यांनी डोभी-दुर्गापूर नॅचरल गॅस पाइपलाइन आणि उड्डाणपूलाचे उद्घाटन केले.

तृणमूल काँग्रेसच्या छुप्या मित्रांपासून सावध राहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या छुप्या मित्रांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. आपली लढाई तृणमूल काँग्रेसशी असली तरी डावे आणि काँग्रेस यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. या सगळ्यांनी पडद्यामागे हातमिळवणी केली आहे. दिल्लीत या सगळ्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा होतात. यापूर्वी केरळात पाच वर्षे जनतेची लूट करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांची हातमिळवणी झाली होती, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

विकासाच्या शर्यतीत पश्चिम बंगाल पिछाडीवर

स्वातंत्र्यपूर्व काळात पश्चिम बंगाल देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडीवर होता. त्याकाळी बंगालमध्ये उत्तम पायाभूत सुविधा होत्या. नोकरदरांना अनेक संधी उपलब्ध होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये बंगाल ही विकासाची गती कायम राखण्यात अपयशी ठरल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

बंगाल ‘टीएमसी’ला राम कार्ड दाखवणार: मोदी

पश्चिम बंगालमध्ये फुटबॉलचा खेळ विशेष लोकप्रिय आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना शाब्दिक कोटी केली. बंधू आणि भगिनींनो बंगाल फुटबॉलवर प्रेम करणारं राज्य आहे. त्यामुळेच मी फुटबॉलच्या भाषेत सांगू इच्छतो, तृणमूल काँग्रेसने एका पाठोपाठ एक असे कित्येक ‘फाउल’ केलेले आहेत. गैरप्रशासन, विरोधकांवर हल्ला व हिंसाचाराचा फाउल, बंगालच्या लोकांचा पैसा लुटण्याचा फाउल व श्रद्धेवर होत असलेल्या हल्ल्यांचा फाउल. बंगालची जनता सर्वकाही पाहत आहे. त्यामुळे आता लवकरच बंगाल तृणमूलला राम कार्ड दाखवणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...