आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी गलवानमध्ये झालेल्या हिंसक चकमकीच्या 18 दिवसानंतर अचानक लडाखला भेट दिली. यावेळी त्यांनी नाव न घेता चीनवर निशाना साधला. मोदी म्हणाले की, 'विस्तारवादानेच मानव जातीचा विनाश केला, इतिहास साक्षी आहे, अशा शक्ती फार काळ टिकल्या नाहीत.'
यावेळी मोदींनी लद्दाखमधील जवानांची भेट घेतली, हॉस्पीटलमध्ये जाऊन जखमी जवानांना भेटले. यावेळी मोदींनी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओळी वाचल्य, ‘‘उनके सिंहनाद से सहमी धरती रही अभी तक डोल कलम, आज उनकी जय बोल।’’
यावेळी मोदी सैनिकांना म्हणाले- तुमचे धैर्य, तुमचे सामर्थ्य आणि समर्पण अतुलनीय आहे. तुम्ही जगात कोणापेक्षाही कमी नाहीत. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही भारत मातेची सेवा करत आहात, असे संपूर्ण जगात कोणीच करू शकत नाही. आपण आता जिथे उभे आहात त्यापेक्षा उंच तुमचे धैर्य आहे.
तुमची इच्छाशक्ती पर्वतांप्रमाणे आहे: मोदी
मोदी पुढे म्हणाले, ‘‘तुमच्या आजु-बाजुला असलेल्या दगडांपेक्षा जास्त मजबुत तुमच्या भुजा आहेत. तुमची इच्छाशक्ती पर्वतांप्रमाणे आहे. तुमच्यामध्ये येऊन मला जाणवत आहे. फक्त मलाच नाही, तर संपूर्ण देशाला विश्वास आहे की, तुम्ही सीमेवर संपूर्ण ताकतीने उभे आहात. ही बाब देशातील प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहित करते. आत्मनिर्भर भारताचा संकल्प तुमच्यामुळे पुर्ण होतो. तुम्ही दाखवलेल्या शौर्यामुळे संपूर्ण जगाला भारताची शक्ती आणि सामर्थ्य दिसले आहे.’’
‘‘राष्ट्र कवि रंग जिनके सिंहनाद से सहमी धरती रही अभी तक डोल, कलम आज उनकी जय हो। मी आज तुम्हाला जय म्हणतो. तुमचे अभिनंदन करतो. मी गलवानमध्ये शहीद झालेल्या जवानांनाही परत एकदा श्रद्धांजली अर्पण करतो. यात पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण, देशाच्या कानाकोपऱ्यातील जवानाने आपली विरता दाखवली. त्यांच्या सिंहनादामुळे पृथ्वी अजूनही त्यांचा जय-जयकार करत आहे. आज प्रत्येक भारतीयाचे मस्तक तुमच्या पुढे आदराने नतमस्तक होऊन नमन करत आहे. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमच्या शौर्यामुळे फुगली आहे.’’
कमजोर शांती प्रस्तापित करू शकत नाही: पीएम
मोदी पुढे म्हणाले की, ''प्रत्येक आक्रमणानंतर भारत जोमाने उभा राहिला आहे. देशाच्या, जगाच्या, मानवतेच्या प्रगतीसाठी शांती आणि मित्रता प्रत्येकाला आत्मसात करावी लागेल. आम्ही जाणतो की, कमजोर कधीच शांतीचे पाऊल उचलू शकत नाही. वीरता असेल, तरच शांती स्थापन करता येईल. भारत आज जल-थल-आकाशापर्यंत आपली ताकद वाढली आहे, याच्या मागचा उद्देश मानव कल्याण आहे. विश्व युद्ध असो किंवा विश्व शांती, जेव्हाही गरज पडली, तेव्हा जगाने आपल्या वीरांचा पराक्रम पाहिला. आपण नेहमी मानवता आणि मानवतेचे रक्षण करण्याचे काम केले.''
''आज जग विकासवादाला समर्पित आहे आणि विकासाच्या खुल्या स्पर्धेचे स्वागत करत आहे. देशाच्या संरक्षणाचा विचार मनात येतो, तेव्हा सर्वात आधी दोन माता माझ्या डोळ्यासमोर येतात. पहिली, आपल्या सर्वांची भारत माता, दुसरी त्या वीर माता, ज्यांनी तुमच्यासारख्या यौद्ध्यांना जन्म दिला.''
आम्ही सैन्य आणि सैनिकांना मजबुत करत आहोत- मोदी
मोदी पुढे म्हणाले की- सैन्यासाठी आधुनिक शस्त्र असो किंवा तुमच्यासाठी गरजेचे सामान, यावर आम्ही खूप लक्ष देत आहोत. बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च 3 पट वाढवला आहे. यामुळे बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट आणि सीमेवर रस्ते-पुल बनवण्याचे काम वेगाने झाले आहे. आता तुमच्यापर्यंत सामान येण्यासाठीही कमी वेळ लागतो. सैन्याच्या समन्वयासाठी चीफ ऑफ डिफेंस असो किंवा वॉर मेमोरियल, तसेच वन-पेंशन वन रँकचा मुद्दा असो. आम्ही सैन्य आणि सैनिकांना मजबूत करत आहोत.
आम्ही तुमच्या स्वप्नातील भारत बनवू- मोदी
ज्या भारताचे स्वप्न पाहत, तुम्ही देशाचे सीमेवर रक्षण करत आहात, तो भारत आम्ही बनवू. हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यास 130 कोटी भारतीय मागे हटणार नाहीत. मी तुम्हाला विश्वास देतो की, आत्मनिर्भर भारत लवकरच बनले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.