आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Latest News, Goa Mopa International Airport Inauguration Update I Latest News  

PM मोदी करणार मोपी विमानतळाचे उद्घाटन:गोव्यातील दुसरे इंटरनॅशनल एअरपोर्ट, प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होतील

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्यातील दुसऱ्या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 11 डिसेंबरला करणार आहेत. रविवारी ते सकाळी गोव्याला भेट देणार असून या दौऱ्यात ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. देशात मजबूत कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यावर PM मोदींनी विशेष भर दिलेला आहे.

6 वर्षात विमानतळाचे काम पूर्ण
नोव्हेंबर 2016 मध्ये गोव्याच्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. गोव्यातील हे दुसरे विमानतळ असेल. पहिला विमानतळ दाबोलीम येथे आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळाची वार्षिक क्षमता 44 लाख प्रवाशांची आहे. तर प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याची एकूण क्षमता वार्षिक 10 दशलक्ष प्रवासी असेल.

पहिल्या टप्प्यात विमानतळाची वार्षिक क्षमता 4.4 दशलक्ष प्रवाशांची आहे.
पहिल्या टप्प्यात विमानतळाची वार्षिक क्षमता 4.4 दशलक्ष प्रवाशांची आहे.

35 देशांतर्गत आणि 18 आंतरराष्ट्रीय ठिकाणी प्रवेश
गोव्याच्या दाबोलीम विमानतळावर सध्या 15 देशांतर्गत आणि 6 आंतरराष्ट्रीय स्थानांशी कनेक्टिव्हिटी आहे. मोपा विमानतळावरून 35 देशांतर्गत आणि 18 आंतरराष्ट्रीय ठिकाणी पोहोचता येणार आहे.

मोपा विमानतळाद्वारे 35 देशांतर्गत आणि 18 आंतरराष्ट्रीय ठिकाणी पोहोचता येते
मोपा विमानतळाद्वारे 35 देशांतर्गत आणि 18 आंतरराष्ट्रीय ठिकाणी पोहोचता येते

मोपा विमानतळावर रात्रीच्या पार्किंगची सोय
मोपा विमानतळावर नाईट पार्किंग सुविधा असणार आहे. जी दाबोलिम विमानतळावर सुविधा उपलब्ध नव्हती. तर मोपा विमानतळावर 25,000 मेट्रिक टन हाताळणी क्षमतेसह मालवाहतूक सुविधा असेल.

मोदी सरकारच्या काळात विमानतळांची संख्या दुप्पट झाली
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून म्हणजेच 2014 पासून देशातील विमानतळाच संख्या 74 वरून दुप्पट होऊन सुमारे 140 किंवा त्याहून अधिक झाली आहे. येत्या 5 वर्षात देशातील विमानतळांची संख्या 220 पेक्षा जास्त करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. जेणेकरून केवळ देशाशीच नव्हे पर विदेशातही संपर्क मजबूत करता येईल.

बातम्या आणखी आहेत...