आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • PM Narendra Modi Launch Ujjwala 2.0 Scheme Update | Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) Scheme

उज्ज्वला 2.0 लाँच:एक कोटी महिलांना मिळणार मोफत LPG गॅस कनेक्शन; पीएम मोदी म्हणाले- कनेक्शनसाठी पत्त्याचा दाखला आवश्यक नाही, सेल्फ डिक्लेरेशन पुरे

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
पीएम मोदींनी जुन्या लाभार्थ्यांशी साधला संवाद. - Divya Marathi
पीएम मोदींनी जुन्या लाभार्थ्यांशी साधला संवाद.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्मयातून उज्ज्वला 2.0 योजनेचे उद्घाटन केले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 कोटी महिलांना मोफत कनेक्शन देण्यासाठी विशेष फंड देखील जारी करण्यात आला आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात असलेल्या एक हजार महिलांना नवीन मोफत LPG कनेक्शन देण्यात आले. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांतच्यासह उपमुख्यमंत्र्यांनी डिजिटल उपस्थिती नोंदवली.

यावेळी सरकारकडून या योजनेत मोफत LPG कनेक्शनसोबत भरलेले गॅस सिलेंडर सुद्धा मोफत दिले जात आहे. सोबतच, ज्या आर्थिक मागास घटकांना यापूर्वीच्या उज्ज्वला योजनेत कनेक्शन मिळाले नाहीत. त्यांना या योजनेमध्ये कनेक्शन दिले जाणार असे सांगण्यात आले आहे.

पत्त्याचा पुरावा आवश्यक नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेचे लोकार्पण केले. तसेच आता उज्ज्वला 2.0 चा लाभ घेण्यासाठी भारतीयांना शिधापत्रिका आणि पत्त्याचा दाखला जमा करण्याची आवश्यकता नाही. गरजवंतांना स्वतः एक डिक्लेरेशन (लेखी शपथपत्र) देऊन योजनेचा लाभ घेता येईल.

पीएम मोदींनी जुन्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात उज्ज्वला योजनेतील जुन्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांना काही समस्या आहेत का अशी विचारणा केली. यासोबतच, त्यांनी आता सिलेंडर भरले आहेत की नाही हे देखील जाणून घेतले.

3 कोटी गरिबांना वीज कनेक्शन
या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर योजनांतील लाभार्थ्यांची आकडेवारी जारी केली. त्यानुसार, पंतप्रधान आवास योजनेत 2 कोटींपेक्षा अधिक लोकांना पक्की घरे बांधता आली. या घरांवर प्रामुख्याने महिलांची मालकी आहे. तर सौभाग्य योजनेच्या माध्यमातून जवळपास 3 कोटी गरीब कुटुंबांच्या घरात वीज कनेक्शन देण्यात आले असे पंतप्रधानांनी सांगितले.

उज्जवला योजनेची अशी आहे पात्रता

 • अर्ज करणारी व्यक्ती महिला असावी
 • महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे
 • महिला BPL कुटुंबातून असायला हवी
 • महिलेकडे BPL कार्ड आणि शिधापत्रिकाअसावे
 • अर्ज करणारी महिला किंवा तिच्या कुटुंबातील एकही सदस्याच्या नावे LPG कनेक्शन असू नये

असे करता येईल अर्ज

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला pmuy.gov.in/ujjwala2.html या वेबसाइटला भेट द्यावी लागेल
 • या ठिकाणी एक डाउनलोड फॉर्मचा पर्याय दिसेल
 • फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्यातील आवश्यक माहिती भरावी
 • हा फॉर्म आता तुम्हाला एलपीजी केंद्रावर जमा करावा लागेल
 • यासाठी लागणारी इतर आवश्यक कागदपत्रे सोबत जमा करावीत
 • यानंतर कागदांची पडताळणी होईल आणि कनेक्शन मिळेल
बातम्या आणखी आहेत...