आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज असाम आणि बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दोन्ही राज्यात येत्या काही काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी असाममधील धेमाजीच्या सिलपाथरमध्ये अनेक योजनांचे लोकार्पण केले. येथे सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. परंतु, निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग करत असतो, त्यामुळे मोदींच्या या अंदाजामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मोदी आपल्या भाषणात म्हणाले, ‘मला माहितीये, तुम्ही निवडणुकीची वाट पाहत आहात. मागच्या वेळेस 4 मार्चला निवडणुकीची घोषणा झाली होती. यावेळेसही मारच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हे निवडणूक आयोगाचे काम आहे, ते लवकरच घोषणा करतील. पण, मी निवडणुकीपूर्वी अनेकदा असाम, बंगाल, केरळ, तमिळनाडू आणि पुडुचेरीला भेट देण्याचा प्रयत्न करेल.’
मागच्या सरकारांनी असामसोबत सावत्र वागणूक दिली
मोदी पुढे म्हणाले की- ब्रह्मपुत्रच्या याच नॉर्थ बँकमधून 8 दशकांपूर्वी असामिय सिनेमाने यात्रा सूरू केली होती. भारतरत्न भूपेन हजारिका यांनी लिहीले होते- ब्रह्मपुत्रेचे दोन्ही किनारे दिव्यांनी झगमगून जातील. मी सोशल मीडियामध्ये पाहिले, तुम्ही कशा प्रकारे दिवाळी साजरी केली. हे असामच्या विकासाचे दृष्य आहे. असामच्या विकासाचा आधार येथील इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या आधीच्या सरकारांनी नॉर्थ बँकसोबत सावत्र वागणूक दिली. सर्वांची साथ, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास असलेल्या आमच्या सरकारने भेदभाव दूर केला.
असममध्ये या योजनांचे उद्घाटन-भूमीपूजन
मोदींनी असामच्या बोगाईगावात इंडियन ऑइलच्या इंडमॅक्स (INDMAX), डिब्रूगडच्या मधुबनमध्ये ऑइल इंडिया लिमिटेडची सहाय्यक टँक फार्म आणि तिनसुकियाच्या हेबेडा गावात गॅस कंप्रेसर स्टेशनचे लोकार्पण केले. याशिवाय, मोदींनी धेमाजी इंजीनियरिंग कॉलेजचेही उद्घाटन केले. तसेच, सुआलकुची इंजीनियरिंग कॉलेजचे भूमीपूजन केले.
सायंकाळी बंदाल दौरा
पंतप्रधान मोदी असामनंतर बंगालला जाणार आहेत. सायंकाळी 4:30 वाजता पश्चिम बंगालच्या हुगलीमध्ये अनेक रेल्वे प्रोजेक्ट्सचे उद्घाटन करतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.