आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2021 ची पहिली मन की बात:पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचाराचा उल्लेख केला, म्हणाले - प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान पाहून देश दुखी झाला

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मन की बात कार्यक्रमात लसीकरणावर केले भाष्य, म्हणाले - लसीकरण कार्यक्रमाने जगात एक आदर्श ठेवला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रेडिओवर नवीन वर्षातील पहिली मन की बात केली. पंतप्रधानांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या हिंसाचारावर दुःख व्यक्त केले. दिल्लीत 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान पाहून देश अत्यंत दुखी झाल्याचे ते म्हणाले.

लसीकरण कार्यक्रमाने जगात एक आदर्श ठेवला

पंतप्रधान म्हणाले की, "मेड इन इंडिया व्हॅक्सिन हे आत्मनिर्भर भारताचे प्रतिक आहे. भारताची कोरोनाची लस संपूर्ण जागासाठी आशेचा किरण ठरली आहे. तसेच आपल्या देशातच जगातील सर्वाच मोठे लसीकरण सुरू आहे. गेल्या 15 दिवसात देशात 30 लाख कोविड योद्ध्यांना लस दिली आहे. अमेरिकेला याच कामासाठी 18 तर ब्रिटन सारख्या समृद्ध देशाला 36 दिवस लागले, याकडेही त्यांनी देशावासियांचे लक्ष वेधले.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त अमृत महोत्सव सुरू होणार

पंतप्रधान म्हणाले की, "स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असल्याने यंदापासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होणार आहे. स्वातंत्र्य आणि बिहार बद्दल बोलताना मला आणखी एक टिप्पणी करायला आवडेल. मुंगेरच्या जयराम जी यांनी मला शहीददिनानिमित्त लिहिले. 15 फेब्रुवारी 1932 रोजी ब्रिटिशांनी वीरांच्या गटाला ठार मारले. त्यांचा गुन्हा असा होता की ते वंदे मातरम् आणि भारत माता की जय या घोषणा देत होते. अशी घटना देशासमोर आणल्याबद्दल मी जयरामजींचे आभार मानतो.

यावेळी पंतप्रधानांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांबाबत संशोधन करून त्यांच्यावर लेख लिहिण्याचे आवाहन केले. ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानावर दस्ताऐवज करण्यात येणार असून त्यासाठी लेख देण्याचे आवाहन त्यांनी केले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर त्याची माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.