आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Development Plans Should Not Be Stalled In The Name Of Environment, Modi To Environment Minister, Latest News And Update

पर्यावरणाच्या नावाने विकास योजना रखडता कामा नये:पीएम मोदी पर्यावरण मंत्र्यांना म्हणाले - अर्बन नक्षल्यांनी वर्षानुवर्षे सरदार सरोवर प्रकल्प रोखला

अहमदाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाच्या नावाखाली विकास प्रकल्पांत अनावश्यक आडकाठी आणू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाच्या सर्वच राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय संमेलनात केली. या प्रकरणी त्यांनी शहरी नक्षलवाद्यांनी अनेक वर्षांपर्यंत सरदार सरोवराचे बांधकाम बंद पाडल्याचा दाखला दिला.

नेहरूंच्या हस्ते पायाभरणी, मोदींकडून उद्घाटन

मोदी म्हणाले - देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सरदार सरोवर धरणाच्या बांधकामाला सुरूवात झाली. प्रथम पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी त्याची पायाभरणी केली होती. त्यानंतर अर्बन अर्थात शहरी नक्षलवादी सक्रिय झाले. त्यांनी नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या या धरणामुळे पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते असा दावा करत या प्रकल्पाला विरोध दर्शवला.

परिणामी, हे धरण बांधण्यास अनेक वर्षे लागली. मी पंतप्रधान झाल्यानंतर या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या विलंबामुळे मोठ्या प्रमाणात पैसा वाया गेला. आता धरण पूर्ण झाल्यानंतर अर्बन नक्षल्यांचे दावे किती फोल होते हे लक्षात येईल.

मोदींनी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील एकता नगरात आयोजित पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे व्हिडिओ लिंकद्वारे उद्घाटन केले.
मोदींनी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील एकता नगरात आयोजित पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे व्हिडिओ लिंकद्वारे उद्घाटन केले.

कट कारस्थानाला सामोरे जा

पीएम मोदी म्हणाले - हे शहरी नक्षलवादी सध्याही सक्रिय आहेत. त्यामुळे मी तुम्हाला पर्यावरणाच्या नावाने प्रकल्प रोखून धरू नका अशी विनंती करो. या प्रकरणी कोणत्याही कट कारस्थानाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे एक संतुलित दृष्टिकोन असला पाहिजे.

पीएम म्हणाले - आजचा नवा भारत, नवा विचार व नव्या दृष्टिकोनासह मार्गक्रमण करत आहे. आज भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाही आहे.
पीएम म्हणाले - आजचा नवा भारत, नवा विचार व नव्या दृष्टिकोनासह मार्गक्रमण करत आहे. आज भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाही आहे.

सर्क्युलर अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन द्या

मोदी म्हणाले - आज आपण पाहतो की, ज्या राज्यांत पाण्याची उपलब्धता खूप जास्त होती, ग्राउं वॉटर वर राहत होते. तिथे आज पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. हे आव्हान केवळ पाण्याशी संबंधित विभागाचेच नाही, तर पर्यावरण विभागानेही हे आपले आव्हान असल्याचे मानून काम केले पाहिजे.

या प्रकरणी सर्वच पर्यावरण मंत्र्यांनी आपापल्या राज्यांत सर्क्युलर अर्थव्यवस्थेला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे. यामुळे घन कचरा व्यवस्थापन व सिंगल यूज प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळवण्याच्या आपल्या मोहिमेला ताकद मिळेल.

बातम्या आणखी आहेत...