आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi To Communicate With 4 Doctors And 100 Healthcare Workers From Varansi

वाराणसी:डॉक्टरांसोबत चर्चा करताना भावुक झाले PM मोदी, म्हणाले- या विषाणूने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतले, ब्लॅक फंगस नवीन आव्हान

वाराणसी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसी येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांशी चर्चा केली. या दरम्यान ते भावुक झाला. मोदी म्हणाले- या विषाणूने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना आपल्यापासून हिरावून घेतले आहे. मी त्यांच्याबद्दल नम्र आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो. या चर्चेदरम्यान मोदींनी ब्लॅक फंगस हे नवीन आव्हान असल्याचे सांगितले.

मोदी म्हणाले, 'काशीचा सेवक म्हणून मी काशीच्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतो. विशेषत: आमचे डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आपल्याला बर्‍याच आघाड्यांवर एकत्र लढावे लागत आहे.'

मोदींच्या चर्चेतील 2 प्रमुख मुद्दे

  • आता आपले लक्ष पूर्वांचलमधील गावे वाचवण्यावर असले पाहिजे मोदी म्हणाले की, यावेळी संसर्गाचे प्रमाण पूर्वीपेक्षा अनेक पटीने जास्त आहे, रूग्णांना अधिक दिवस रुग्णालयात रहावे लागत आहे. यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर दबाव निर्माण झाला आहे. आपण वाराणसीतील कोविडवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो आहोत, परंतु आता आपले लक्ष वाराणसी आणि पूर्वांचल भागातील गावे वाचवण्यावर असले पाहिजे.
  • 'जिथे आजारी, तिथेच उपचार' हा नवीन मंत्र पीएम मोदी यांनी, या दरम्यान एक नवीन मंत्र दिला. ते म्हणाले की, आता आपल्याला 'जिथे आजारी, तेथे उपचार', या मंत्राला फॉलो करावयाचे आहे. यासोबतच, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण व्हॅक्सिनची सुरक्षा देखील पाहिले आहे, ज्यामुळे आपले फ्रंटलाईन वर्कर मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहून लोकांची सेवा करण्यात सक्षम झाले आहेत. हे सुरक्षाकवच येणाऱ्या काळात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल. प्रत्येकाने आता लस घेणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...