आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi To Hold Video Conference With States On Between Surge In Corona Cases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर सरकार:इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली, लॉकडाउन आणि नियमांचे पालन केल्यामुळे यश- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र आणि राज्य सरकारांसमोर संक्रमण कमी करणे आणि अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फ्रेंसद्वारे 21 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा करत आहेत. आपल्या 15 मिनीटांच्या ओपनिंग कमेंट्समध्ये मोदींनी कोरोनाविरोधातील लढाईत सरकारच्या उपाययोजना, राज्यांचा सहयोग, कोरोनापासून वाचण्याचे उपाय, लॉकडाउनचा परिणाम, अनलॉक-1 , अर्थव्यवस्था आणि रिफॉर्म्सबाबत माहिती दिली. यावेळी मोदी म्हणाले की, जगातील मोठ-मोठे जानकार आपल्या लॉकडाउन आणि नियमांबाबत चर्चा करत आहेत. देशातील रिकव्हरी रेट 50% पेक्षा जास्त झाला आहे. 

मोदींच्या भाषणातील 7 महत्वाचे मुद्दे

1. को-ऑपरेटिव फेडरलिज्मचे उदाहरण सादर केले

मोदी म्हणाले की, आपल्या देशाची लोकसंख्या पाहता, इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाची परिस्थिती खूप चांगली आहे. भविष्यात कोरोनावर अभ्यास केला जाईल, तेव्हा भारताचा आणि आपल्या एकजुटीचा उल्लेख होईल. आपण को-ऑपरेटिव फेडरलिज्मचे सर्वात चांगले उदाहरण सादर केले.

2. जगाच्या तुलनेत भारतात कमी मृत्यू

आपल्यासाठी एकाही भारतीयाचा मृत्यू होणे चुकीचे आहे. भारत सध्या त्या देशांमध्ये आहे, जिथे सर्वात कमी मृत्यू झाले. भारत कोरोनाच्या या लढाईत कमी नुकसान करत पुढे जाऊ शकतो. भारत अर्थव्यवस्थेला चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. 2 आठवड्यांच्या अनलॉक-1 मध्ये हीच शिकवण मिळाली आहे की, आपण नियमांचे पालन करुन या महामारीचा सामना करू शकतो.

3. एका चुकीने इतरांना त्रास होऊ शकतो

मास्क किंव फेस कव्हरचा वापर करावा लागणार आहे. मास्क न घालता घराबाहेर पडण्याचा विचार करू नका. हे जितके स्वतःसाठी नुकसानदायक आहे, तितकेच इतरांसाठी आहे. यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करा आणि नेहमी हात धुत राहा. घरातील लहान मुले आणि वृद्धांचे काळजी घ्या.

4. हलगर्जीपणामुळे लढाईत कमी पडू

आता जवळ-जवळ सर्व ऑफीस उघडले आहेत. एकाही चुकीमुळे या लढाईत आपण हरू शकतो, त्यामुळे सवलती मिळाल्या असल्या, तरी काळजी घेणे गरजेचे आहे. आपण जितक्या लवकर कोरोनाला रोखू, तितक्या लवकर अर्थव्यवस्था रुळावर येईल.

5. अर्थव्यवस्था स्थिर होत आहे

येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेचा विस्तार झाल्यावर सर्वांनाच फायदा होईल. आपल्या अर्थव्यवस्थेत ग्रीन शूट दिसत आहे. पॉवर कंजम्प्शन वाढत आहे. मे महिन्यात फर्टिलायजरची विक्री दुप्पट झाली आहे. वाहनांचे प्रोडक्शन लॉकडाउनच्या पूर्वीच्या तुलनेत 70 टक्क्यांवर आले आहे. सलग तीन महिने बंद झाल्यानंतर जून महिन्यात एक्सपोर्टने परत वेग पकडला आहे.

6. लहान उद्योगांना पाठिंबा देत आहोत

सर्व राज्यात फिशरीज, एमएसएमईचा भाग खूप मोठा आहे. यांना सपोर्ट करण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. एमएसएमईला बँकांकडून कर्ज देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 100 कोटींपर्यंतचा टर्नओव्हर असलेल्या उद्योगांना 20% अतिरिक्त क्रेडिट लाभ दिला जाईल. ट्रेड आणि इंडस्ट्रीला वेग पकडण्यासाठी वॅल्यू चेनवर मिळून काम करावे लागेल.

7. रिफॉर्म्समधून शेतकऱ्यांना फायदा होईल

जेव्हा शेतकऱ्यांची कमाई वाढेल, तेव्हा मागणीदेखील वाढेल. विशेष करुन नॉर्थ ईस्ट आणि आदिवासी परिसरातील फार्मिंग आणि हॉर्टिकल्चरमध्ये नवीन संधी येणार आहेत. लोकल प्रोडक्टसाठी ज्या क्लस्टर बेस्ड रणनीतीची घोषणा केली आहे, त्याचा फायदा सर्व राज्यांना होईल.

सर्वात जास्त प्रभावित 15 राज्यांसोबत उद्या चर्चा होणार

मोदी सलग दोन दिवस सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. बुधवारी(ता.17) महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालसह 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होईल.

बातम्या आणखी आहेत...