आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi To Visit Pune, Ahmedabad And Hyderabad, Visit Vaccine Plant Of Three Companies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचा व्हॅक्सिन दौरा:मोदींनी 3 शहरांचा केला दौरा, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्यात व्हॅक्सिन फॅसिलिटीची केली पाहणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी येथे कोवीशील्ड बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)च्या प्लांटचा दौरा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी देशात कोरोना लस बनवणार्‍या तीन कंपन्यांना भेट देण्यासाठी पोहोचले. अहमदाबाद आणि नंतर हैदराबाद येथे कोरोना व्हॅक्सीन प्लांटला भेट दिल्यानंतर मोदी पुण्यात आले. कोविशील्डची निर्मिती करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ची पाहणी त्यांनी केली. मोदी म्हणाले- SII टीमसोबत चांगली चर्चा झाली. त्यांनी मला लस बनवण्यासाठी आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी भविष्यातील योजनांबद्दलही सांगितले. मी लस बनवण्याच्या फॅसिलिटीचा आढावा देखील घेतला.

तत्पूर्वी त्यांनी अहमदाबाद आणि हैदराबादमधील व्हॅक्सिन प्लांटचा दौरा केला. हैदराबादमध्ये, मोदींनी चाचणीच्या यशस्वीतेसाठी 'कोवाक्सिन' ही देशी लस तयार करणार्‍या कंपनी भारत बायोटेकच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.. मोदी म्हणाले- लसीचे काम वेगवान करण्यासाठी त्यांची टीम आयसीएमआर बरोबर काम करत आहे.

मोदींनी भारत बायोटेक प्लांटच्या बाहेर लोकांना अभिवादन केले

तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी सकाळी 10 वाजता अहमदाबादच्या जायडस बायोटेक पार्कला भेट दिली होती. येथे ते एक तास थांबले आणि शास्त्रज्ञांकडून लसीबाबत माहिती घेतली.

मोदींनी पीपीई किट परिधान करून संशोधन केंद्रात व्हॅक्सिनच्या निर्मितीच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी पंतप्रधानांनी कंपनीचे प्रवर्तक आणि कार्यकारी यांच्याशी चर्चा केली. यानंतर ते विमानतळाकडे रवाना झाले. अहमदाबादहून मोदी हैदराबादला जाणार आहेत. दुपारी दीडच्या सुमारास ते भारत बायोटेक प्लांटला भेट देतील आणि त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे भेट देणार आहेत.

पंतप्रधानांनी 24 नोव्हेंबर रोजी 9 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर ते म्हणाले होते की, कोरोना लसीचे किती डोस द्यावे लागतील, तसेच लसीची किंमत, सध्या अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत. दरम्यान मोदींच्या या भेटीनंतर या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे मानले जात आहे.

पहिले ठिकाण : अहमदाबाद

लसीचे नाव : जायकोव-डी़
फॉर्म्युला : जायडस बायोटेक
बनवणारी कंपनी : जायडस बायोटेक
प्लांट: चांगोदर इंडस्ट्रियल एरिया, गुजरात
स्टेटस : तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

पंतप्रधान मोदी सर्वात आधी अहमदाबाद येथे जाणार आहेत. येथे ते जायडस बायोटेक आपली लस जायकोव-डी तयार करत आहेत. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. गुजरात येथीर जायडस बायोटेक कंपनीची ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे.

दुसरे ठिकाण : पुणे

लसीचे नाव : कोवीशील्ड
फॉर्म्युला : ऑक्सफोर्ड विद्यापीठ/ ब्रिटिश फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका
बनवणारी कंपनी : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
प्लांट: पुणे (महाराष्ट्र)
स्टेटस : ट्रायल अंतिम टप्प्यात

पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत

दरम्यान पंतप्रधान पुणे दौऱ्यात अगदी छोट्या कालावधीसाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून लगेच परतणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळवण्यात आले आहे . या सुचने मुळेच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांचे आगमन व दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हॅसिन कोवीशील्ड तयार करण्यासाठी ब्रिटनची कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी भागीदारी केली आहे. SII जगात सर्वाधिक प्रमाणात लस बनवते. ही भारतात प्रथम उपलब्ध होणार असल्याचा तज्ञ आणि सरकारी अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.

कोवीशील्डच्या शेवटच्या टप्प्यातील चाचण्या दोन प्रकारे केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 62% परिणामकारक दिसली तर दुसऱ्या टप्प्यात 90% पेक्षा जास्त. सरासरी, प्रभावीपणा सुमारे 70% आहे.

SIIच्या कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी नुकताच आम्ही लस बनविणे सुरू केल्याचा दावा केला होता. जानेवारीपासून आम्ही दर महिन्याला 5-6 कोटी लस बनवू. जानेवारीपर्यंत आमच्याकडे 8 ते 10 कोटी डोसचा स्टॉक तयार असेल. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर आम्ही पुरवठा सुरू करू असेही ते म्हणाले.

तिसरे ठिकाण : हैदराबाद

लसीचे नाव : कोव्हॅक्सिन
फॉर्म्युला : भारत बायोटेक आणि ICMR
बनवणारी कंपनी : भारत बायोटेक
प्लांट: हैदराबाद
स्टेटस: चाचणी तिसऱ्या टप्प्यात. जानेवारीपर्यंत परिणाम समोर येण्याची अपेक्षा

पंतप्रधान मोदी दुपारी चार वाजता हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीच्या स्वदेशी लस 'कोव्हॅक्सिन'ची माहिती घेतील. एक तास लस बनवणाऱ्या प्लांटवर थांबून ते 5.10 वाजता दिल्लीकडे रवाना होतील.

भारत बायोटेकने लस बनवण्यासाठी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)सोबत भागीदारी केली आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू झाल्या आहेत.

हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी अंबाला कॅंटच्या एका रुग्णालयात या लसीचा डोस घेतला आहे. ही लस मोठ्या प्रमाणावर चाचण्यांमध्ये प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यास, कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या नियामक मंजुरीसाठी अर्ज करेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser