आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर आले. येथे त्यांनी कच्छमध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी बनवणाऱ्या (डिसॅलिनेशन) प्लांट, देशातील सर्वात मोठा सौर प्रकल्प आणि स्वयंचलित दूध प्रक्रिया युनिटची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी येथे पुन्हा एकदा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सल्ला दिला. तसेच शेतकऱ्यांच्या खांद्यावरून बंदूक चालवणाऱ्या पराभव होईल अशी टीकाही केली.
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले - शेतकरी हितासाठी 24 तास सज्ज
अनेक वर्षांपासून कृषी सुधारणांची मागणी केली जात होती. अनेक शेतकरी संघटना देशातील कोठेही धान्य विकण्याचा पर्याय द्यावा अशी मागणी करत होते. सरकारमध्ये असताना विरोधी पक्षात बसलेल्या लोकांना हे पाऊल उचलता आले नाही. जेव्हा आमच्या सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले तेव्हा विरोधकांनी शेतकऱ्यांना भडकावण्यास सुरुवात केली. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास सज्ज आहोत. शेतीवरील खर्च कमी व्हावा, शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे, अडचणी कमी व्हाव्यात, त्यासाठी सतत काम केले. मला देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळाले केले. मला विश्वास आहे की शेतकर्यांच्या आशीर्वादाची शक्ती भ्रमनिरास्यांना, या मुद्द्याचे राजकारण करणाऱ्यांना आणि जे शेतकर्यांच्या खांद्यावर बंदूक करतात त्यांना पराभूत करेल.
कच्छच्या मांडवी येथे डिसॅलिनेशन प्लांट बनवला जाणार
कच्छच्या मांडवी येथे डिसॅलिनेशन प्लांट उभारण्यात येणार आहे. याद्वारे दररोज 10 कोटी (100M ) लिटर समुद्राचे पाणी पिण्याच्या पाण्यात बदलले जाणार आहे. गुजरातमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हा प्लांट महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्याद्वारे परिसरातील सुमारे 8 लाख लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येईल. गुजरातमधील पाच डिसॅलिनेशन प्लांटपैकी हा एक प्रकल्प आहे. असेच प्रकल्प दाहेज, द्वारका, घोघा भावनगर आणि गिर सोमनाथ येथे उभारण्यात येत आहेत.
121 कोटीच्या खर्चाने उभारणार दुध प्रक्रिया प्रकल्प
कच्छमध्ये स्वयंचलित दूध प्रक्रिया व पॅकेजिंग प्लांट बांधले जाणार आहे. 121 कोटी रुपये खर्चून याची उभारणी केली जाईल. यामध्ये दररोज 2 लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाणार आहे.
30 गीगावॅटपर्यंत विजेची निर्मिती
कच्च्या विघकोट गावात हे हायब्रीड नूतनीकरणायोग्य उर्जा पार्क तयार केले जात आहे. 72 हजार 600 हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेल्या या एनर्जी पार्कमुळे 30 गीगावॅट वीज निर्मिती करता येणार आहे. येथे पवन व सौर ऊर्जेच्या साठवणुकीसाठी स्वतंत्र विभाग असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.