आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Will Talk To Students Teachers Today At 11 O'clock, Education Plans Of Budget 2022 Will Be Discussed

पंतप्रधानांची विद्यार्थ्यांसोबत चर्चा:2022 च्या अर्थसंकल्पातील शैक्षणिक योजनांवर चर्चा सुरु, पंतप्रधान म्हणाले - तरुणांना सशक्त केल्याने भविष्य सशक्त होईल

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वेबिनारद्वारे विद्यार्थी-शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित इतर लोकांशी चर्चा करत आहेत. या वेबिनारचा उद्देश यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा शैक्षणिक क्षेत्रावर झालेला सकारात्मक परिणाम सांगणे हा आहे. या वेबिनारचे आयोजन शिक्षण मंत्रालयाने केले आहे. यामध्ये शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, कौशल्य विकास संस्था, विद्यार्थी, शिक्षक व इतर तज्ञ सहभागी झाले आहेत.

पंतप्रधान म्हणाले - युवक हे भविष्याचे निर्माते आहेत
पंतप्रधान म्हणाले की, आजचे तरुण हे भविष्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. आजच्या तरुण पिढीला सक्षम बनवणे म्हणजे भारताचे भविष्य सक्षम करणे. 2022 च्या अर्थसंकल्पात हा विचार करून शिक्षण क्षेत्रात 5 गोष्टींवर भर देण्यात आला आहे.

  • गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे
  • कोशल विकास
  • शहरी नियोजन आणि डिझाइन
  • आंतरराष्ट्रीयकरण (भारतात विश्वस्तरीय विदेशी विश्वविद्यालयठ)
  • AVGC (अॅनिमेशन व्हिजुअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक)

डिजिटल यूनिवर्सिटीने होईल सर्व समस्यांचे समाधान
पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी हा अर्थसंकल्प मदत करेल. नॅशनल डिजिटल युनिव्हर्सिटी हे भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील एक अनोखे पाऊल आहे. डिजिटल विद्यापीठामुळे आपल्या देशातील विद्यापीठांमधील जागांच्या कमतरतेची समस्या पूर्णपणे दूर होऊ शकते. ई-विद्या असो, वन क्लास वन चॅनल असो, डिजिटल लॅब असो, डिजिटल युनिव्हर्सिटी असो, अशा शैक्षणिक पायाभूत सुविधा तरुणांना खूप मदत करणार आहेत. भारतातील खेडोपाडी, गरीब, दलित, मागासलेले, आदिवासी या सर्वांना शिक्षणाचे उत्तम समाधान देण्याचा हा प्रयत्न आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वेबिनारसाठी काही विषय निवडण्यात आले आहेत. यामध्ये डिजिटल विद्यापीठे, डिजिटल शिक्षक, एक वर्ग एक चॅनेलची पोहोच वाढवणे, उद्योग-कौशल्य संबंध मजबूत करण्यासाठी प्रोत्साहन देणे, शैक्षणिक संस्थांचा विकास इत्यादींचा समावेश आहे.

2022 च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी 1,04,278 कोटी रुपयांची तरतूद
यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी एकूण 1,04,278 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 11,054 कोटी रुपये अधिक आहे. गेल्या वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी एकूण 93,223 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2022 च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी, भारत सरकार सतत विविध क्षेत्रांसाठी वेबिनार आयोजित करत आहे.

बातम्या आणखी आहेत...