आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करण्यासाठी मुष्यबळ अपुरे पडत आहे. सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. अशात डॉक्टर आणि नर्सची कमतरता होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैद्यकीय वैकर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्याचा एक मोठा निर्णय घेतला. याशिवाय, NEET परीक्षा कमीत कमी 4 महिने पुढे ढकलली जावी आणि कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जावे, अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले.
देशातील कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी उच्च स्तरिय बैठक बोलावली होती. यात मोदींनी जानकारांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मीटिंगमध्ये देशातील ऑक्सीजन आणि मेडिसिनची उपलब्धतेबाबत चर्चा झाली. याशिवाय, आज देशातील कोरोनाविरोधात प्रभावी मॅनेजमेंटसाठी मानव संसाधन वाढवण्याबाबतही मोदींनी बैठक घेतली. बैठकीत मेडिकल आणि नर्सिंग कोर्स झालेल्या विद्यार्त्यांना कोविड ड्यूटी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखे निर्णय घेण्यात आले.
यानुसार, सोमवारी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, वरिष्ठ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोरोना नर्सिंगमध्ये BSc/GNM परिचारिका वापरल्या जाऊ शकतात. तसेच, ड्युटीवर असणार्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समाविष्ट केले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.