आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांचच्या लोकप्रियतेत वाढ:9 महिन्यात वाढले 1 कोटी फॉलोअर्स; आता नरेंद्र मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 6 कोटींवर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2015 मध्ये ट्विटरवर आलेले माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे ट्विटरवर 1.52 कोटी फॉलोअर्स
  • गृहमंत्री अमित शाहंचे 2.16 कोटी तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे ट्विटरवर 1.78 कोटी फॉलोअर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता मायक्रो- ब्लॉगिंग साइट ट्विटरवर वाढत आहे. सध्या नरेंद्र मोटींचे ट्विटरवर 6 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. मोदींनी जानेवारी 2009 मध्ये ट्विटर अकाउंट उघडले होते. सप्टेंबर 2019 मध्ये त्यांचे 5 कोटी फॉलोअर्स होते. फक्त 9 महिन्यात मोदींचे ट्विटरवर एक कोटी फॉलोअर्स वाढले आहेत.

अमित शाह यांचे 2 कोटी 16 लाख फॉलोअर्स

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहर यांचे ट्विटरवर 2 कोटी 16 लाख फॉलोअर्स आहेत. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शाह यांनी मे 2013 मध्ये ट्विटर अकाउंट उघडले होते. यासोबतच एप्रिल 2013 पासून ट्विटरवर आलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे ट्विटरवर 1 कोटी 78 लाख फॉलोअर्स आहेत. 

राहुल गांधींचे 1.52 कोटी फॉलोअर्स

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचे ट्विटरवर 1 कोटी 52 लाख फॉलोअर्स आहेत. राहुल गांधींनी एप्रिल 2015 मध्ये ट्विटर अकाउंट उघडले होते. यासोबतच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या एक कोटींपेक्षा कमी आहे.

ओबामाांच 12.9 कोटी तर ट्रम्प यांचे 8.37 कोटी फॉलोअर्स

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 12.9 कोटी फॉलोअर्स आहेत. सप्टेंबर-19 मध्ये ही संख्या 10.8 कोटी होती. ट्विटरवर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे 8.37 कोटी फॉलोअर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...