आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi To Chair Sixth Governing Council Meeting Of NITI Aayog Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा:पंतप्रधान म्हणाले - 'आपण 70 हजार कोटींचे खाद्य तेल बाहेरुन आणतो, हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जाऊ शकतो'

नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषी निर्यात वाढली, परंतु आपली क्षमता खूप जास्त आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सहाव्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यास राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक (लेफ्टनंट गव्हर्नर) हजर होते. या बैठकीत मोदींचे लक्ष शेतकर्‍यांवर होते.

मोदी म्हणाले की, आपल्याला कृषी देश म्हणून संबोधले जातेय, परंतु तरीही आपण बाहेरून सुमारे 65-70 हजार कोटी रुपयांचे खाद्य तेल आणतो. आपण हे थांबवू शकतो. पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जाऊ शकतात. आपला शेतकरी या पैशांचा हक्कदार आहे, परंतु त्यासाठी आपल्या योजना त्या मार्गाने तयार केल्या पाहिजेत.

आपले शेतकरी जगातही पुरवठा करु शकतात
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी आपण डाळींवर प्रयोग केला, त्यामध्ये आपल्याला यश मिळाले. डाळी बाहेरुन आणण्यात आपला खर्च खूप कमी झाला. अनेक खाद्य पदार्थ आपल्या टेबलवर विनाकारण येतात. आपल्या देशातील शेतकऱ्यांना या पदार्थांच्या उत्पादनामध्ये कोणतीही अडचण नाही. केवळ थोड्या मार्गदर्शनाची गरज आहे. असे अनेक उत्पादन आहेत, जे शेतकरी केवळ स्वतःच्या देशासाठीच नाही तर संपूर्ण जगभरात सप्लाय करु शकतात. यासाठी सर्व राज्यांनी आपल्या एग्रो क्लायमेटिक रीजनल प्लानिंगची स्ट्रॅटजी बनवण्याची गरज आहे.

कृषी निर्यात वाढली, परंतु आपली क्षमता खूप जास्त आहे
मोदी म्हणाले की गेल्या काही वर्षांत शेतीपासून ते पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय याकडे एक समग्र दृष्टीकोन अवलंबला गेला. परिणामी, कोरोना काळात देशातील कृषी निर्यातीत बरीच वाढ झाली आहे, परंतु आपली क्षमता जास्त आहे. आपल्या उत्पादनांचे वेस्टेज कमीतकमी कमी करण्यासाठी स्टोरेज आणि प्रोसेसिंगवरही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

केंद्र-राज्यांनी एकत्र काम करावे
मोदी म्हणाले की, देशाच्या प्रगतीचा आधार हा आहे की केंद्र आणि राज्याने एकत्र काम करून निश्चित दिशेने वाटचाल केली पाहिजे. को-ऑपरेटिव्ह फेडरलिज्म अजून सार्थक बनवणे आणि एवढेच नाही आपल्याला प्रयत्नपूर्वक कॉम्पीटीटिव्ह, को-ऑपरेटिव्ह फेडरलिज्मला केवळ राज्यांमध्येच नाही तर जिल्ह्यातही पोहोचवण्यात आला पाहिजे.