आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कडेकोट बंदोबस्त:पंतप्रधान अयोध्येत 3 तास मुक्कामी, नेपाळ सीमेपर्यंत अतिदक्षतेचा इशारा, ओळखपत्राची कडक तपासणी

अयोध्या | विजय उपाध्याय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण शहरात सात सुरक्षा झोन बनवले, निगराणीसाठी संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक दौऱ्याची व्यापक पातळीवर तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी अयोध्येत पहिल्यांदाच येत आहेत. त्यांचा येथे तीन तासांहून जास्त वेळ मुक्काम राहू शकतो. हे लक्षात घेऊन सुरक्षा व सजावटीच्या तयारीला वेग आला आहे.

वातावरण पूर्णपणे धार्मिक ठेवण्यावर भर दिला जात आहे. अयोध्येला जोडणारे महामार्ग व रस्त्यांवर सुरक्षा बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. अयोध्येत प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी आेळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्यात आली आहे. सर्व संवेदनशील ठिकाणी, वीज केंद्र, इमारती इत्यादी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. त्यासाठी नियंत्रण कक्ष बनवण्याचे काम सुरू आहे. या नियंत्रण कक्षातून अयोध्येत सर्वत्र नजर ठेवली जाऊ शकते. हवाई सुरक्षादेखील वाढवली आहे. मोदी हनुमानगढी व शरयू घाटावरही जाऊ शकतात. या दोन्ही तीर्थक्षेत्रांबरोबरच शहरातील मठ-मंदिरांचीही सजावट केली जात आहे. राज्याचे एडीजी प्रशांत कुमार म्हणाले, सुरक्षा कडक करण्यात आली आहे. अयोध्या प्रशासनाने दल व पोलिस अधिकाऱ्यांची मागणी केली होती. त्याची पूर्तता केली. अयोध्येत सात झोन तयार केले आहेत.

तयारी : पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल दाखल, हेलिपॅड तयार
भूमिपूजनाची तयारी सुरू असतानाच शुक्रवारी केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल अयोध्येत दाखल झाले. त्यांनी हनुमानगढी, रामलल्लाचे दर्शन केले. राज्याचे पर्यटनमंत्री नीलकंठ तिवारीदेखील त्यांच्यासमवेत होते. दोन्ही मंत्र्यांनी कारसेवकपुरम गाठले व त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांच्याशी अयोध्येतील पर्यटन योजनांवर चर्चा केली. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येचे शेजारी जिल्हे व नेपाळ सीमेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पहिल्यांदाच : देशातील आध्यात्मिक शक्ती एकत्रित
५ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा देशातील अध्यात्मिक शक्ती एकाचवेळी ७० एकरच्या जन्मभूमी परिसरात उपस्थित राहतील. या परिसरात भूमिपूजनादरम्यान सनातन धर्मासोबत इतर पंथ, संप्रदायाचे धर्मगुरू उपस्थित राहतील. देशभरातून येणाऱ्या धर्मगुरूंच्या स्वागतासाठी व्यवस्था केली जात आहे. विहिंपचे पूर्व उत्तर प्रदेशचे संघटन मंत्री अंबरीश म्हणाले, परिसरात प्रत्येक पंथ, धर्माच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत देशातील सर्वधर्म समभावाचे उद्दिष्ट साकार होईल.

अयोध्येबाहेरही सुरक्षेत वाढ, प्रसादाची जोरदार तयारी
वाराणसी : अयोध्येकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.
उत्सव : अयोध्येत ३ ऑगस्टपासून घराबाहेर लाखो दीप उजळणार
१६ लाख लाडू : राजदूत कार्यालयात प्रसाद म्हणून बिकानेरी लाडू पाठवणार. चार लाख पाकिटे तयार.
भेट : ट्रस्ट पंतप्रधान मोदींना कोदंड राम व लव-कुश यांच्या मूर्ती भेट करेल.
लंगर : लाडूचे वाटप, भंडारा व लंगर हाेणार