आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • PM To Release 8th Instalment Of Financial Benefit Under PM KISAN On 14th May; News And Live Updates

9.5 कोटी शेतकर्‍यांना मिळाले 2 हजार रुपये:पंतप्रधानांनी आठवा हप्ता केला जारी; बंगालमधील 7 लाख शेतकर्‍यांना पहिल्यांदा लाभ, यादीमध्ये नाव तपासण्यासाठी ही स्टेप फॉलो करा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सरकारने शेती व त्यासंबंधी कामांशी संबंधित कर्ज परतफेडीची तारीख वाढवली.
 • अल्प मुदतीसाठी 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणार्‍यांना मिळणार लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता 'पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत' देशातील शेतकर्‍यांशी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगव्दारे संवाद साधला. दरम्यान, मोदी यांनी यावेळी आठवा हप्ता जारी केला असून देशातील 9.5 कोटी लोकांना याचा लाभ मिळाला आहे. विशेष पश्चिम बंगालमधील 7 लाख शेतकर्‍यांनी या योजनेचा पहिल्यांदा लाभ घेतला आहे. यामाध्यमातून प्रत्येक शेतकर्‍यांच्या खात्यात 2000-2000 रुपये जमा करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 20 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काय-काय सांगितले?

 • बंगालमधील 7 लाख शेतकर्‍यांना यामाध्यमातून लाभ मिळाला असून आज यांचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यात पोहचले आहे. जसे-जसे राज्य सरकारकडून शेतकर्‍यांचे नावे मिळत जातील तसे त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
 • देशात आतापर्यंत या योजनेंतर्गत (पीएम किसान सन्मान निधी) सुमारे 11 कोटी शेतकर्‍यांना 1 लाख 35 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यापैकी 60 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये हे फक्त कोरोनाकाळात देण्यात आले आहे.
 • देशातील कोट्यावधी शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन सरकारने बँकांच्या वतीने कृषी व त्यासंबंधित कामांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कर्जासाठी 30 जून 2021 पर्यंत परतफेडची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
 • कोरोना काळात भारत सरकार जगातील सर्वात मोठी मोफत रेशन योजना चालवित आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अण्णा योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षी 8 महिन्यांसाठी गरिबांना मोफत रेशन देण्यात आले. यावेळी मे आणि जूनमध्ये देशातील 80 कोटींहून अधिक सहकार्यांना रेशन मिळाले आहे.

'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना'

देशातील शेतकर्‍यांना मदत केंद्र सरकाराकडून 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना' राबवली जाते. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये मिळतात. ही रक्कम लाभार्थ्यांना 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.

9.5 कोटी शेतकरी कुटुंबांना 19 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये मिळणार
या योजनेंतर्गत उद्या 9.5 कोटी लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात 19 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पंतप्रधानसह कृषी मंत्री नरेंद्र तोमरदेखील सामील असणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये अंतरिम बजेटमध्ये जाहीर करण्यात आली असून डिसेंबर 2018 पासून अंमलात आली होती.

सूचीमध्ये आपले नाव असे चेक करा
जर आपण या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर पंतप्रधान किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in) वर जाऊन आपले नाव तपासू शकता. नाव तपासण्यासाठी आपण या प्रक्रियेला फॉलो करा.

 • सर्व प्रथम पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in भेट द्या.
 • वेबसाइट उघडल्यानंतर मेनूबारमधील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा.
 • येथील लाभार्थी यादीवर क्लिक करा.
 • यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावची माहिती प्रविष्ट करा.
 • यानंतर आपल्याला Get Report क्लिक करावे लागेल. या अहवालात आपल्या गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती मिळेल.
 • या यादीमध्ये आपण आपले नाव तपासू शकता.

यादीमध्ये आपले नाव नसल्यास अशी तक्रार नोंदवा
जर आपण नोंदणी केली असेल आणि आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नसेल तर आपण पीएम किसान या वेबसाइटवरील हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता.

 • पीएम किसान हेल्पलाईन - 155261
 • पंतप्रधान किसान टोल फ्री - 1800115526
 • पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक - 011-23381092, 23382401
 • ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in वर ईमेलद्वारे तक्रार देखील केली जाऊ शकते.

रजिस्ट्रेशन करताना या गोष्टींवर लक्ष द्या
नोंदणी करताना आपले नाव, पत्ता, बँक खाते याची माहिती व्यवस्थित भरुन चेक करा. जर यातील कोणतीही माहिती चुकीची असेल तर आपल्याला 2000 रुपयाचा हप्ता मिळणार नाही. नोंदणी करताना जर एखादी माहिती चुकीची भरली गेली असेल तर त्यामध्ये बदल करता येतो.

बातम्या आणखी आहेत...