आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लखनऊत ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी 3.0 मध्ये सुमारे 80 हजार कोटींच्या 1406 औद्योगिक प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी ते म्हणाले की, "उत्तर प्रदेशच्या युवा शक्तीवर भरवसा करण्यासाठी गुंतवणूकदारांचे आभार. येथील तरुणांची प्रतिभा, त्यांचा संकल्प व समर्पण तुमची स्वप्ने पूर्ण करतील. यूपीत 80 हजार कोटींहून अधिकचे करार झालेत. या विक्रमी गुंतवणुकीतून राज्यात रोजगाराच्या हजारो नव्या संधी निर्माण होतील. जग आज ज्या विश्वासू सहकाऱ्याचा शोध घेत आहे, त्यावर खरे उतरण्याचे सामर्थ्य केवळ भारताच्या लोकशाहीत आहे."
कधी वेळ मिळाला तर जुनी व नवी काशी पाहून या
पीएम मोदी म्हणाले -''मी काशीचा खासदार आहे. त्यामुळे मी तुम्हाला वेळ काढून काशी पाहण्याची विनंती करतो. प्राचीन काशी एवढी नवी नवेली होऊ शकते, हे केवळ यूपी सरकारच्या संकल्पामुळे शक्य झाले आहे. यूपीची ताकद एक जिवंत उदाहरण आहे.''
मोदी म्हणाले -''भारत जी-20 अर्थव्यवस्थांत सर्वात वेगाने घोडदौड करत आहे. आज भारत, ग्लोबल रिटेल इंडेक्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत, जगातील तिसरा सर्वात मोठा एनर्जी कंझ्युमर देश आहे. गत वर्षी 100 हून अधिक देशांतून 84 अब्ज डॉलर्सची विक्रमी परकीय गुंतवणूक आली आहे. भारताने गत आर्थिक वर्षात 417 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 30 लाख कोटींहून अधिकचा माल निर्यात करुन एक विक्रम केला आहे.''
मोदींच्या अन्य मोठ्या गोष्टी -
पंतप्रधानांचा रिफॉर्म, परफॉर्म व इन्फॉर्मचा मंत्री यूपीने स्विकारला -योगी
गत 4 वर्षांत आम्ही 3 लाख कोटींहून अधिक रुपयांचे प्रस्ताव प्रत्यक्ष अंमलात आणले. आज तिसऱ्या ग्राऊंड ब्रेकिंग सेरेमनीमध्येही 80 हजार कोटींचे प्रकल्प प्रत्यक्षात आलेत. आम्ही पंतप्रधानांचा रिफॉर्म, परफॉर्म व इन्फॉर्मचा मंत्र स्विकारला आहे. आम्ही पारंपरिक उद्योगांना ओडीओपीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले. आज आम्ही या क्षेत्रातून संपूर्ण जगात निर्यात करत आहोत, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.
हौसला बना लिया उड़ान का, तब देखना फिजूल कद आसमान का : मंगलम बिर्ला
आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले की, आमचा समूह राज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक करत आहे. त्यातून जवळपास 35 हजार जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार मिळेल. उत्तर प्रदेश आज सर्वात महत्वपूर्ण गुंतवणुकीचे डेस्टिनेशन बनले आहे. राज्याने गुंतवणुकीच्या क्षेत्रात मोठी उडी घेतली आहे. येथे गुंतवणूक मित्राच्या माध्यमातून सिंगल विंडो सिस्टीम लागू झाल्याने मोठी मदत मिळाली आहे. योगींच्या नेतृत्वात राज्य पुढे जात असून, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात सक्षम बनत आहे. ते म्हणाले -'जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का, तब देखना फिजूल है कद आसमान का।'
'मिले ना मंजिल मुझे, तो मैं तरीके बदलता हूं' - गौतम अदानी
ग्राऊंड ब्रेकिंग सेरेमनीत उद्योगपती गौतम अदानी म्हणाले -माझे नशिब आज मला 2 महान नेत्यांची भेट घेण्याची संधी मिळाली. हे नेते भारताचे नव भारतात रुपांतर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. यावेळी त्यांनी एका हिंदी कवितेच्या ओळी वाचल्या. ते म्हणाले -
मैं सोच भी बदलता हूं,
मैं नजरिया भी बदलता हूं।
मिले ना मंजिल मुझे,
तो मैं तरीके भी बदलता हूं।
बदलता नहीं अगर मैं कुछ,
तो मैं लक्ष्य नही बदलता हूं।
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.